Headlines

लोणी खुर्द परिसरात पेरणीची लगबग:100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका‎

वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील लोणी खुर्द परिसरातील तलवाडा, वाकला, पाराळा, भादली, टुनकी, अंचलगाव, नायगव्हाण, चिकटगाव, खरज, निमगाव या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. मोठा पाऊस नसला तरी सुरुवातीच्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतीकामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी मका, कपाशी, अद्रक, मूग, भुईमूग आणि सोयाबीनच्या लागवडीला सुरुवात केली आहे. काही शेतकरी…

Read More

गुंतागुंतीची शस्त्रक्रिया; सुपरच्या डॉक्टरांना यश:स्वादुपिंडातील गाठीच्या त्रासामुळे शहरातील 12 वर्षीय मुलगी झाली होती त्रस्त‎

अमरावती स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल) शहरातील १२ वर्षीय मुलीच्या पोटातील गाठीची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. गाठीमुळे रुग्ण बालिकेचे पोट वरच्या बाजूस सरकले होते, त्यामुळे तिला अन्न घेण्यास अडचण येत होती तसेच गॅस्ट्रोस्कोपी करतानाही अडथळे येत होते. श्वास घेणे आणि चालणेदेखील तिच्यासाठी कठीण झाले होते. परिस्थिती गंभीर असल्याने तातडीने…

Read More

रायगडमध्ये डोंगराला तडे:नाणेघोळ गावावर भूस्खलनाचे सावट! धोका ओळखून 60 ते 70 ग्रामस्थांचे स्थलांतर

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असतानाच पोलादपूर तालुक्यातून एक अत्यंत धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. तालुक्यातील देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील ‘नाणेघोळ’ गावाजवळील डोंगराला अतिवृष्टीमुळे चक्क अर्धा किलोमीटर लांबीच्या आणि अर्धा ते एक फूट रुंदीच्या महाकाय भेगा पडल्या आहेत. डोंगराचा भाग खचू लागल्याने आणि संभाव्य भूस्खलनाचा मोठा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलत, गावातील…

Read More

मोझरी- डवरगाव मार्गावर नियम धाब्यावर:डांबरी रस्ताच फोडला, चार ठिकाणी खोदकाम : वाहनचालकांचे जीव धोक्यात‎

गुरुकुंज मोझरी ते डवरगाव या सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या डांबरी रस्त्यावर चार ठिकाणी रस्ता फोडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे खुलेआम नुकसान होत आहे. हे काम कोण करत आहे, त्याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर शेती, वीटभट्ट्या तसेच एमआयडीसी परिसर आहे. त्यामुळे औद्योगिक…

Read More

लाडसावंगी आरोग्य केंद्राच्या बोगस वेतनाचा अहवाल द्या‎:जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नुतन सदस्यांनी आरोग्य विभागाला धरले धारेवर‎

वैजापूरला दोन महिन्यांपासून रुग्णवाहिकेवर चालक नाही. लाडसावंगीतील एक महिन्यापासून डॉक्टर रजेवर आहेत. कर्मचारी प्रत्यक्ष कामावर हजर नसतानाही त्यांना पगार देण्यात आल्याचा आरोप राधाकिशन पठाडे यांनी केला. त्यावर अधिकाऱ्यांनी ‘त्यांना वर्क फ्रॉम होम’ (ऑनलाइन काम) दिले होते, असे उत्तर देताच सभागृह चांगलेच तापले. आरोग्य सेवा वर्क फ्रॉम होमने चालते का? असा सवाल सदस्यांनी विचारला. प्राथमिक आरोग्य…

Read More

सरसकट कर्जमाफीसाठी विकास मंचाचे निवेदन

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मधील निकषांमुळे सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचा आरोप करत शेतकरी विकास मंचने चांदूर बाजारच्या तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. निवडणूक काळात शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र नव्या शासन निर्णयामध्ये विविध अटी व शर्ती…

Read More

नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरण: आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ:व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले हजर, 12 मे पर्यंत कोठडी

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला पुणे न्यायालयाने १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, आरोपीला बुधवारी न्यायालयात प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर सादर करण्यात आले. ही घटना शुक्रवार, १ मे रोजी दुपारी ३ ते रात्री ८ च्या…

Read More

राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होणार:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 3 आठवड्यांच्या सत्रावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचे सविस्तर वेळापत्रक ठरवण्यासाठी आज मुंबईत पार पडलेली ‘कामकाज सल्लागार समितीची’ महत्त्वाची बैठक आता संपली आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राज्याचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सविस्तर चर्चा…

Read More

'क्रेडाई'चे 100 ट्रॅफिक वॉर्डन पुण्यात तैनात:वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे पोलिसांसोबत सामंजस्य करार

पुणे शहर वाहतूक पोलिस आणि बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था ‘क्रेडाई पुणे’ यांच्यात वाहतूक व्यवस्था प्रभावी, सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार, ‘क्रेडाई पुणे’ने पुणे शहर वाहतूक पोलिसांना आगामी तीन महिन्यांसाठी १०० ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून दिले आहेत. पुण्यात सध्या सुरू असलेला पावसाळा, आगामी संत तुकाराम महाराज व संत…

Read More

धक्कादायक:पत्नी सोडून गेल्यानंतर मुले रोज त्रास देत असल्याने मुलीचा निर्घृण खून करून मृतदेह जंगलात फेकला

पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका बापानेच आपल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत आरोपी बापाला अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे. सागर शिंदे (२९, रा. गायकवाड वस्ती, मोशी, ता. हवेली) असे या नराधम बापाचे नाव आहे. पत्नी…

Read More