मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आणि शिवसेना कुणाची यावर सुरू असलेल्या कायदेशीर लढाईवर भाजप आमदार राम कदम यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. रस्त्यावर आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र सध्या मुंबईत गणेशोत्सवानिमित्त मोठी गर्दी असते. अशा सणा
.
आमदार राम कदम म्हणाले की, मराठा समाजाच्या 13 पैकी 12 मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. उरलेली एक मागणी ही संविधान आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित आहे. ती न्यायालयात टिकली पाहिजे, यासाठी योग्य मार्गाने काम करणे गरजेचे नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व-विचारसरणी सोडली
आमदार राम कदम म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी आपले संपूर्ण जीवन हिंदुत्वासाठी वेचले. त्यांनी ज्या राजकीय शत्रूंना कधीही पायाजवळ उभे केले नाही, आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत. उद्धव ठाकरे हिंदू विरोधी लोकांच्या सोबत गेले असून त्यांनी शिवसेना आणि तिची मूळ राजकीय विचारसरणी दोन्हीही सोडून दिले आहे, असा घणाघात कदम यांनी केला.
उबाठाला 3 वेळेस फटकारले
आमदार राम कदम म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सुनावणी दरम्यान न्यायालयात ज्या गोष्टी मांडल्या आहेत, त्या सर्वांचे त्यांच्याकडे पुरावे आहेत. शिवसेना नेमकी कोणाची, याबाबतचा न्यायालयाचा निकाल कधी आणि कोणाच्या बाजूने लागेल हे सांगता येणार नाही. मात्र, न्यायालयाने उबाठाला 3 वेळा फटकारले आहे.
हे ही वृत्त वाचा
हा माणूस तुम्हाला फसवत आहे, जाळ्यात फसू नका-हिंदुस्तानी भाऊ
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाबद्दल एकेरी भाषेत टीका करत आहेत. तुम्ही त्यांना हलक्यात घेत आहात का? ते असेच इतक्या मोठ्या पदावर गेले नाही.

तुमच्या सारखे किती गायब झाले असतील सांगता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना धमकी देताय, तुमच्या मागे असणाऱ्या लोकांनी सांगितले तेच तुम्ही बोलत आहात. 10 वेळा उपोषण झाले, सोबतचे सर्व जण सोडून गेले सर्वांना समजले जरांगे बाथरुममध्ये जाऊन खातात सर्व लोकं त्यांना सोडून चालली आहेत, असे विकास पाठक उर्फ ‘हिंदुस्तानी भाऊ’यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर मुंबई केंद्रशासित होणार नाही, पण अशी चर्चा कशाला?:शशिकांत शिंदेंचा भाजपला सवाल, जरांगेंच्या आंदोलनावरही भाष्य

मुंबई आणि महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या संदर्भाने निर्माण झालेल्या चर्चेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. मुंबई ही महाराष्ट्राच्या विकासात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे, असे सांगतानाच मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत महाराष्ट्राच्या जनतेने चिंता करण्याची गरज नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, अशा प्रकारचा विषय चर्चेत आणण्याची गरजच काय, असा सवालही शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला. वाचा सविस्तर