![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि त्यांच्या घटनात्मक पदावरील कारकीर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यभरात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जाणार आहे. नगरविकास विभाग आणि मुंबई भाजपच्या संयुक्त पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये विविध लोककल्याणकारी व नागरिककेंद्रित उपक्रमांची मोठी मालिकाच आयोजित करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून 26 विविध उपक्रमांचे आयोजन सामान्य प्रशासन आणि नगरविकास विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला स्थानिक गरजा लक्षात घेऊन 26 विविध सेवा उपक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अभियानासाठी शासनाकडून वेगळा निधी दिला जाणार नसून स्थानिक संस्थांना त्यांच्या स्वनिधीतूनच हा खर्च करावा लागणार आहे. या मोहिमेत पुढील महत्त्वाचे घटक समाविष्ट असतील: मुंबईत ‘मधुमेहमुक्त मुंबई’ संकल्पना अन् 10 हजार बूथवर रोषणाई मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा पारंपरिक पंधरवढ्याऐवजी ‘जनसेवा हीच प्रभुसेवा’ या सूत्रावर आधारित महिनाभराचे नियोजन करण्यात आले आहे. अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबर रोजी ‘सेवा दिवस’ म्हणून होईल. मुंबईतील प्रमुख आकर्षणे आणि कार्यक्रम खालीलप्रमाणे असतील: कला, संस्कृती आणि योजनांचा प्रचार शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘मेरे सपनों का भारत’ ही चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्यांच्या माध्यमातून सरकारी योजनांचा प्रचार करणारा ‘नमो सेवा’ उपक्रम, तसेच अंगणवाडी व आशा सेविकांचा सन्मान करणारा ‘अंगण मिलन’ कार्यक्रम आयोजित केला जाईल. याशिवाय ‘सेवा ज्योती कलश यात्रा’ आणि ‘सेवा सेतू’ शिबिरांद्वारे नागरिकांना थेट शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. महिनाभर चालणाऱ्या या भव्य सेवा पर्वाची सांगता 17 ऑक्टोबर रोजी ‘सुशासन संवाद’ या कार्यक्रमाने होणार आहे.
Source link
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस:महाराष्ट्रात 10 हजार बूथवर दीपोत्सव ते 'इनोव्हेशन चॅलेंज'; महिनाभर 'सेवा संकल्प' पर्व राबवणार!