Headlines

Shivraj Mothegaonkar CBI Custody; NEET Paper Leak Probe Update



NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता जुळू लागले आहेत. या प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र लेक्चरर मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली. आता NEET परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकाऱ्याचाही सह

.

याबाबत अधिकची माहिती अशी की, नीट पेपरफुटी प्रकरण केवळ राजयपूर्तेच मर्यादेत न राहता देशभरातील मोठे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. यात अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात प्राध्यापकांचा देखील समावेश आहे. यापूर्वी दोन प्राध्यापकांना सीबीआयने अटक केली होती. आता शिवराज मोटेगावकर यांना देखील अटक करण्यात आली आहे. कारण मोटेगावकर यांचे राज्यभयरात नीट परीक्षेसंदर्भात मोठे क्लासेस आहेत. गेल्याच आठवड्यात मोटेगावकर यांचे ज्या ज्या ठिकाणी क्लासेस आहेत त्या ठिकाणी छापेमारी केली होती. यावेळी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि काही इलेक्ट्रोनिक गॅझेट देखील सीबीआयने ताब्यात घेतली होती.

त्यानंतर आज शिवराज मोटेगावकर यांना आज सीबीआयने अटक केली असून त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर या संपूर्ण रॅकेटमध्ये मोटेगावकरांचा काय संबंध आहे हे समोर येणार आहे. तसेच जे प्रमुख आरोपी आहेत, लातूरचे पी.व्ही कुलकर्णी, पुण्यातल्या मनीषा मांढरे यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या सर्वांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याचा तपास सीबीआयकडून करण्यात येत आहे.

प्राध्यापिका मनीषा मांढरेंना 14 दिवसांचीह कोठडी

दरम्यान, बॉटनी शिक्षिका मनीषा मांढरेला 14 दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे. पुण्यातील बायोलॉजी लेक्चरर मनीषा गुरुनाथला दिल्लीतील CBI मुख्यालयात चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. एजन्सीचा दावा आहे की मांढरे NTA च्या पेपर सेटिंग कमिटीचा भाग होती. मांढरेला माहीत होते की परीक्षेत कोणते प्रश्न येतील. तिने परीक्षेपूर्वी पुण्यात विशेष कोचिंग क्लास चालवला. तिथे तिने विद्यार्थ्यांना बॉटनी आणि झूलॉजीचे प्रश्न लिहून दिले होते. तपासात हे देखील समोर आले आहे की, मांढरेने पुण्याहून अटक करण्यात आलेल्या ब्युटिशियन मनीषा वाघमारेच्या माध्यमातून NEET देणाऱ्या विद्यार्थ्यांना तिच्या कोचिंगमध्ये प्रवेश मिळवून दिला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *