Headlines

Sunetra Pawar Appeals To Join Gyanbharatam Manuscript Survey


भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘ज्ञानभारतम्’ राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र

.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, महाराष्ट्राला हजारो वर्षांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. असंख्य संत, संशोधक, विचारवंत आणि विद्वान यांच्या योगदानातून हा अमूल्य ज्ञानसाठा निर्माण झाला आहे. हा वारसा जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच उद्देशाने भारत सरकारने 16 मार्च 2026 पासून ‘ज्ञानभारतम्’ राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू केले आहे.

हस्तलिखितांचे जतन आणि डिजिटायझेशन

या अभियानाअंतर्गत देशभरातील ऐतिहासिक हस्तलिखितांचा शोध, नोंदणी, दस्तऐवजीकरण, जतन आणि डिजिटल स्वरूपात संवर्धन केले जाणार आहे. ७५ वर्षांपूर्वी हाताने लिहिलेली पुस्तके, ग्रंथ आणि ज्ञानपर साहित्य या अभियानात समाविष्ट करण्यात आले आहे.

अध्यात्म, धर्म, तत्त्वज्ञान, आयुर्वेद, गणित, ज्योतिष, नाट्यशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, खगोलशास्त्र आणि इतर विविध ज्ञानशाखांशी संबंधित हस्तलिखिते या अभियानासाठी पात्र आहेत. ही हस्तलिखिते कागद, ताडपत्र, भूर्जपत्र, कापड, ताम्रपट किंवा इतर कोणत्याही माध्यमावर असू शकतात.

वैयक्तिक संग्रहांनाही संधी

घरात, मठ, मंदिरे, आश्रम, ग्रंथालये, संशोधन संस्था किंवा खासगी संग्रहात जतन केलेली प्राचीन हस्तलिखितेही या अभियानात नोंदवता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या संग्रहातील मौल्यवान दस्तऐवजांची माहिती शासनाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मालकी कायम राहणार

या अभियानाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हस्तलिखितांची मालकी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडेच कायम राहणार आहे. शासन स्वतःच्या खर्चातून या हस्तलिखितांचे जतन आणि डिजिटायझेशन करणार असल्याने नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता या उपक्रमात सहभागी व्हावे, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

‘Gyan Bharatam’ ॲपवर करा नोंदणी

ज्यांच्याकडे प्राचीन हस्तलिखिते उपलब्ध आहेत त्यांनी ‘Gyan Bharatam’ मोबाईल ॲपवर त्यांची माहिती नोंदवावी. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे.

तसेच अधिक माहितीसाठी gyanbharatam.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताच्या अमूल्य ज्ञानवारशाचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित जपणूक करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रीय अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

हेही वाचा…

CJPचे जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू: समर्थकांनी रात्रीतून पुन्हा स्टेज उभा केला; अभिजीत दीपके म्हणाले- आज पुन्हा संसद मार्च

कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP चे जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. CJP च्या संसद मार्चनंतर दिल्ली पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता जंतर-मंतर रिकामे केले होते. पण, आंदोलक आणि अभिजीत दीपके 6 तासांनंतर पुन्हा परतले. सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दीपके यांनी इंडिया टुडेसोबत खास बातचीतमध्ये सांगितले की, ते मंगळवारीही संसद मार्च करणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. आम्ही जंतर-मंतरवरून हटणार नाहीत. सविस्तर वाचा

अश्विनी भिडेंचा इगो मोदींपेक्षा जास्त- देशपांडे:साकीनाका, चेंबूर दुर्घटनेवरून मनसे आक्रमक; दोषींवर कारवाईसाठी उद्या मुंबईत आंदोलन

दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस लाठीमाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा लाठीमार जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारा असल्याचा आरोप करत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका केली. तसेच मुंबईतील चेंबूर दुर्घटनेतील जबाबदारांवर कारवाईच्या मागणीसाठी आज सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर मनसे आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.