Headlines

Supriya Sule Slams Maharashtra Govt Over Gokul Dairy Election Controversy


महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि सहकार क्षेत्राचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीवरून राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वाखाल

.

गोकुळच्या सभासदांनी सतेज पाटील यांच्या आघाडीला स्पष्ट आणि निर्विवाद जनादेश दिला असताना, सत्ताधारी महायुतीने मागील दाराने सत्ता काबीज करण्यासाठी संस्थात्मक स्वायत्ततेवर घाला घातल्याची चर्चा आता पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय व सहकार वर्तुळात रंगू लागली आहे.

गोकुळच्या कारभारात हस्तक्षेप थांबवा -सुप्रिया सुळे

गोकुळ दूध संघातील अध्यक्ष निवडीच्या घडामोडींवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत महायुती सरकारला सुनावले. “गोकुळच्या शेतकरी सभासदांनी आपला कौल अत्यंत स्पष्टपणे दिलेला आहे. सभासदांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना संस्थेचा कारभार करू देणे आणि या जनादेशाचा आदर राखणे हे सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य आहे. त्याऐवजी तांत्रिक अडचणी पुढे करून अध्यक्ष निवडीची बैठकच होऊ न देणे हा सभासदांच्या विश्वासाचा थेट अपमान आहे.”

सहकारी चळवळीची गळचेपी खपवून घेणार नाही

“संस्थेच्या अंतर्गत कामकाजात आणि लोकशाही प्रक्रियेत वारंवार असा शासकीय व राजकीय हस्तक्षेप करणे निषेधार्ह आहे. या संपूर्ण लढ्यात आम्ही काँग्रेस नेते सतेज पाटील आणि गोकुळच्या सभासदांसोबत खंबीरपणे उभे आहोत. सत्ताधाऱ्यांनी हे कुटिल डाव तात्काळ थांबवून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरळीत पार पाडू द्यावी.”

अर्ज भरण्याची मुदत संपल्याने सभा तहकूब

गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा नाट्यमय घटनाक्रम घडला. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून अध्यक्षपदासाठी निवडणुकीपूर्वीच गोकुळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.

कोरमअभावी निवडणूक रखडली

आज 29 ऑक्टोबर रोजी अध्यक्ष निवडीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, महायुती गटाच्या सर्व संचालकांनी या महत्त्वपूर्ण बैठकीकडे पाठ फिरवली. महायुतीच्या संचालकांनी सामूहिक दांडी मारल्यामुळे आवश्यक कोरम पूर्ण होऊ शकला नाही. अखेर अर्ज भरण्याची मुदत संपल्याने निवडणूक अधिकाऱ्यांना सभा तहकूब करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

सलग 3 बैठकांना गैरहजर राहिल्यास संचालकपद रद्द होणार?

महायुतीच्या या रणनीतीमुळे गोकुळच्या संचालकांवरच आता कायदेशीर टांगती तलवार निर्माण झाली आहे. सहकारी संस्थांच्या कायद्यानुसार, जर एखादा संचालक सलग 3 अधिकृत बैठकांना गैरहजर राहिला, तर त्याचे संचालकपद रद्द करण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यामुळे महायुतीचे संचालक पुढील २ बैठकांमध्येही अशीच रणनीती अवलंबणार का, की त्यांचे पद धोक्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सतेज पाटलांची कायदेशीर चाचपणी

स्पष्ट बहुमत असतानाही कृत्रिम अडथळे निर्माण करून अध्यक्ष निवड लांबवली जात असल्याने सतेज पाटील यांच्या ‘अजिंक्यतारा’ कार्यालयावर तातडीने कायदेशीर तज्ज्ञ व वकिलांची बैठक पार पडली. या मनमानीविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आघाडीकडून तपासला जात आहे.

स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा डाव न्यायालयीन पातळीवर फसला?

गोकुळमध्ये सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी महायुतीकडून पडद्यामागे इतरही पर्यायांची चाचपणी सुरू होती. स्वीकृत संचालकांची संख्या वाढवून त्यांना अध्यक्ष निवडीत मतदानाचा अधिकार मिळवून देता येईल का, अशी चाचपणी सत्ताधाऱ्यांनी केली होती.

न्यायालयात टिकणे अशक्य

मात्र, सहकार कायद्यानुसार अशा प्रकारचा निर्णय न्यायालयीन कसोटीवर क्षणभरही टिकणारा नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केल्याने महायुतीची ही चाल मागे पडल्याची चर्चा आहे. गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून पेटलेला हा संघर्ष आता केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित न राहता राज्यपातळीवर पोहोचला असून, पुढील बैठकीत सतेज पाटील गट सत्ताधाऱ्यांच्या या चक्रव्यूहाला कसा छेद देतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

——————————————————————

हेही वाचा…

सतीश चव्हाणांचे 18 वर्षांचे साम्राज्य संपवण्यात माझा खारीचा वाटा: अब्दुल सत्तार म्हणाले- लपूनछपून नाही, उघडपणे पाडले; नवनाथ बन यांच्या टीकेलाही दिले सडेतोड प्रत्युत्तर

“मराठवाडा पदवीधर मतदारसंघात 18 वर्षे आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांनी कोणतेही काम केले नव्हते. त्यामुळे त्यांचे 18 वर्षांचे साम्राज्य संपवण्यात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या ऐतिहासिक विजयात माझा खारीचा वाटा आहे. मी लपूनछपून नव्हे, तर पहिल्या दिवसापासून उघडपणे सतीश चव्हाणांच्या विरोधात प्रचार केला. मतदान केंद्रांना भेटी देतानाही माझी हीच ठाम भूमिका होती आणि ती आजही बदललेली नाही,” असा मोठा राजकीय गौप्यस्फोट शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.