![]()
शहरातील बस स्टँड परिसर सध्या अवैध वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग आणि अतिक्रमणामुळे पूर्णपणे विस्कळीत झाला असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बस स्टँडच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने आधीच जागेची कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी बस ये-जा करताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. बस स्टँडच्या प्रवेशद्वाराजवळ नागरिक सर्रास दुचाकी वाहने पार्क करत असल्याने बसेसना आत-बाहेर जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना उशीराचा फटका बसतो. त्यातच समांतर रस्त्यावरून गावातील दुचाकी व चारचाकी वाहनांची सततची वर्दळ असल्याने परिस्थितीअधिकच बिकट झाली. याशिवाय बस स्टँडच्या बाहेर काळी-पिवळी रिक्षा चालकांनी रस्त्यावरच वाहनं उभी केल्याने प्रवेशमार्ग अडथळ्यांनी भरून गेला आहे. नियमांचे उल्लंघन करत रिक्षा उभ्या राहत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवणे अशक्य झाले आहे. अवैधरित्या दुचाकी पार्किंग याकरिता स्वतः आगार व्यवस्थापक व त्यांचे कर्मचारी सकाळी बस स्टॅन्ड प्रवेशद्वाराजवळ थांबून यावर कार्यवाही करताना दिसून येत होते. दरम्यान, प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करत वाहतूक नियंत्रण, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, रिक्षांसाठी निश्चित थांबा आणि अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्याची मागणी जोर धरत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, बस स्टँड परिसरात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थापनाची तातडीने गरज असून अवैध पार्किंग, रिक्षा थांबे आणि अतिक्रमणावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत नागरिकांकडून वारंवार कारवाईची मागणी होत आहे संबंधित खात्यांकडून कारवाईची अपेक्षा ^अवैध वाहतूकीबाबत व बस स्टँडच्या भिंतीला लागून अतिक्रमण करून बसलेले विक्रेते, याबाबत प्रशासकीय कार्यवाही बाबत संबंधित खात्यांना कळवण्यात आले आहे. त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आहे. – नीलेश बेंडकुडे, आगार व्यवस्थापक, एरंडोल.
Source link
अडचणींचा सामना:बस स्टँडला अवैध वाहतुकीचा वेढा; प्रवासीवर्ग त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष, बस चालकांची बस नेताना हाेतेय माेठी कसरत