![]()
शहरातील अनधिकृत भंगार दुकानांवर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. या मोहिमेदरम्यान घुमंतुकांकडून भंगार साहित्य खरेदी करणाऱ्या अनधिकृत भंगार दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले. शहर स्वच्छ दिसावे, शहरातील कचरा कमी व्हावा, या उद्देशाने विना परवानगी सुरू असलेला भंगार व्यवसाय बंद करण्यासाठी मनपाचा अतिक्रमण निर्मूलन विभाग पुढे सरसावला. या कारवाईत एकूण चार ट्रक भंगार साहित्य जप्त करण्यात आले आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्या आदेशान्वये व सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अन्सार अहमद व संदीप सोनवणे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान शहराच्या विविध भागांत अस्ताव्यस्त टाकण्यात आलेले चार ट्रक भंगार साहित्य जप्त करण्यात आले. ते कंपोस्ट डेपो येथे जमा करण्यात आले आहे. मनपा पथकाने श्याम चौक येथील बीएसएनएल कार्यालयाच्या मागील भागात, जुने तहसील कार्यालय परिसरात तसेच जवाहर गेट रोडवरील रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत भंगार दुकानांचे अतिक्रमण हटविले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगार साचले होते. त्यामुळे गलिच्छपणा निर्माण झाला होता. याबाबत काही नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रारीही केल्या होत्या. येथून मार्गक्रमण करणेही नागरिकांना कठीण झाले होते. ते लक्षात घेऊन अनधिकृत भंगार दुकानांविरोधात कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत पोलिस कर्मचारी व अतिक्रमण विभागातील कर्मचारी उपस्थित होते. पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा: ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली असून, नागरिकांनी व व्यावसायिक आस्थापनांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे झोन क्र. ३ यांच्या मार्गदर्शनाखाली रुक्मिणी नगर परिसरात आज प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यानसदर मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले तसेच स्वास्थ्य निरीक्षक विनोद टांक, सुनील चोरपगार, सचिन सैनी, मनीष हडाले, निलेश तंबोले, प्रसाद कुलकर्णी, संजय माहूरकर आणि शैलेश डोंगरे यांनी सहभाग घेतला. रुक्मिणी नगरात प्लास्टिक जप्तीत ८ हजारांचा दंड वसूल झोन क्र. ३ दस्तूरनगर अंतर्गत रुक्मिणीनगर परिसरात एकूण १६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत काही ठिकाणी कापडी व कागदी पिशव्यांचा तसेच ५१ मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळून आला. आर्चिस पान सेंटर या आस्थापनेस ५ हजाराचा दंड आकारण्यात आला. तसेच विजय काळे, शुभम आदमने व अभिजीत आदमने यांच्याकडून प्रत्येकी १ हजार रु. दंड वसूल करण्यात आला. अशाप्रकारे ८ हजार रु.दंड वसुल केला.
Source link
अनधिकृत भंगार दुकानांवर कारवाई; शहरात चार ट्रक भंगार साहित्य जप्त:कचरा कमी करण्याचा उद्देश, विना परवानगी सुरू होता व्यवसाय