Headlines

अन्नछत्र मंडळाकडून 300 हून अधिक वृक्षांची जोपासना:6 वर्षांचे सातत्य, सोलापूर रस्ता बनला हिरवागार




‘अन्नदान हेच श्रेष्ठ दान’ हा मंत्र जपत जगप्रसिद्ध संस्था उभी करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी आता पर्यावरणाच्या संवर्धनातून अक्कलकोटचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे सोलापूर रस्त्यावर गेल्या सहा वर्षांपासून लावलेली झाडे आज डौलाने बहरली असून, हा मार्ग सुखद आणि हिरवागार झाला आहे. हरवलेले वैभव परत मिळवण्याची जिद्द सुमारे ३०-४० वर्षांपूर्वी अक्कलकोट-सोलापूर रस्ता कोन्हाळी गावापर्यंत वडाच्या झाडांनी इतका दाटलेला होता की जमिनीवर सूर्यप्रकाशही पडत नसे. मात्र, रस्ते विकासाच्या कामात या झाडांची मोठी कत्तल झाली. हे हरवलेले वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी जनमेजयराजे भोसले यांनी ११ जानेवारी २०२० रोजी वृक्षारोपणाची मोठी मोहीम हाती घेतली. आज या मार्गावर दुतर्फा ३०० पेक्षा जास्त वडाची झाडे उभी आहेत, जी पाहता अक्कलकोटचे गतवैभव पुन्हा प्राप्त होईल, असा आशावाद नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. वडाच्या झाडांचे ‘ऑक्सिजन पार्क’ भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या वडाच्या झाडांची लागवड करण्यावर राजेंनी भर दिला आहे. ही झाडे भरपूर ऑक्सिजन देतात, प्रदूषण कमी करतात आणि पक्षी-प्राण्यांना नैसर्गिक निवारा मिळवून देतात. “एक झाड तोडले तर त्या ठिकाणी १० झाडे लावलीच पाहिजेत, ही जिद्द बाळगून त्यांनी ही वृक्षलागवड चळवळ व्यापक केली आहे.अक्कलकोटचे नाव पर्यावरण रक्षणातही अग्रक्रमाने घेतले जात आहे. ^पर्यावरणप्रेमींचा आशावाद जनमेजयराजे भोसले यांची पर्यावरण संरक्षणाची तळमळ ही प्रत्येकाने अंगीकारण्यासारखी आहे. त्यांच्या धाडसी निर्णयक्षमतेमुळेच आज सोलापूर रस्त्यावर १ किलोमीटरपर्यंत दुतर्फा झाडांची दाट सावली पाहायला मिळते. ही चळवळ अशीच गतीने सुरू राहिल्यास प्रज्ञापुरी अक्कलकोटचे नाव पर्यावरण रक्षणातही अग्रक्रमाने घेतले आहे. जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष (अन्नछत्र मंडळ) केवळ रस्तेच नव्हे तर ‘राजे फत्तेसिंह क्रीडांगण’ देखील अन्नछत्र मंडळाने हिरवेगार केले आहे. टँकरने पाणी घालून झाडांचे जतन केले. क्रीडांगणाच्या संरक्षक भिंतीवर ‘वसुंधरा वाचवा’, ‘पाणी वाचवा’, शिक्षण, आरोग्य आणि योगाचे महत्त्व सांगणारे प्रेरक संदेश लिहून त्या भिंती बोलक्या केल्या आहेत. क्रीडांगणावर येणाऱ्या नागरिकांसाठी उत्तम आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे. क्रीडांगणावर येणाऱ्या नागरिकांसाठी उत्तम आसन



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *