Headlines

अभिजीत दीपकेंविरोधात उपोषण करणाऱ्यांची प्रकृती खालावली:पोलिसांकडून रुग्णालयात दाखल; आंदोलकांचा उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा




कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आता नवे वळण लागले आहे. गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले मनीष ब्रह्माभट आणि राहुल पांड्या यांची प्रकृती खालावल्याने, पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, “पोलिसांनी आम्हाला बळजबरीने रुग्णालयात दाखल केले असून, आमचे हे उपोषण कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहील,” अशी भूमिका मनीष ब्रह्माभट यांनी रुग्णालयातून मांडली आहे. सीजेपीची ‘क्या बोलती पब्लिक’ मोहीम दरम्यान, दीपके यांच्या विरोधात आंदोलन सुरू असतानाच, दुसरीकडे अभिजीत दीपके यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मोठ्या देशव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे. ‘क्या बोलती पब्लिक’ या नावाने सप्टेंबर महिन्यापासून हे अभियान संपूर्ण देशभरात राबवले जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत सीजेपीचे कार्यकर्ते गाव-शहरांमध्ये जाऊन तरुणांशी थेट संवाद साधतील. देशातील वाढती बेरोजगारी आणि महागडे शिक्षण हे या मोहिमेचे प्रमुख मुद्दे असणार आहेत, असे दीपके यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा आणि पक्षविस्तार याच पार्श्वभूमीवर, सीजेपीने गुरुवारी आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या सदस्यांच्या नावांचीही अधिकृत घोषणा केली. पक्षाची पाळेमुळे देशभरात रुजवण्यासाठी आगामी सहा महिन्यांत राज्य समन्वय समित्या, तसेच लोकसभा आणि शहर पातळीवरील समन्वय समित्या (युनिट्स) स्थापन केल्या जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. नीट पेपरफुटी आंदोलनाची पार्श्वभूमी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) अलीकडेच ‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात मोठे रान उठवले होते. २० जून ते २५ जुलै असे सलग ३६ दिवस दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीने धरणे आंदोलन केले होते. अखेर २५ जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर, सीजेपीने हे आंदोलन यशस्वीपणे मागे घेतल्याची घोषणा केली होती. आता ‘क्या बोलती पब्लिक’ या नव्या मोहिमेतून सीजेपी पुन्हा एकदा तरुणांचे प्रश्न ऐरणीवर आणण्याच्या तयारीत आहे. हेही वाचा.. 25 दिवसांतील चौथी भेट!: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात शरद पवार गटाचे 8 खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार; कारण काय? राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे आज पक्षाच्या आठ खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. पक्षाच्या खासदारांसह पंतप्रधानांची अशी सामूहिक भेट पहिल्यांदाच होत असल्याने या भेटीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या बैठकीत मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामे, राज्यातील पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी, विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच विविध लोकहिताचे विषय मांडले जाणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *