Headlines

आगामी काळात लोकप्रतिनिधी अन् अधिकाऱ्यांचेही मूल्यमापन करणार:दुष्काळावर मात करण्यासाठी मंत्री गोरे यांनी भरला दम




दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. त्यामुळे येत्या काळात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या कार्याचेही मुल्यमापन केले जाईल. शासनाची चाके असलेल्या या दोन्ही घटकांनी गावे दत्तक घ्यावी. तेथे जाऊन लोकचळवळ उभारावी. एका अर्थाने दुष्काळाला संधी समजून गावांतील कामकाजांचे नियोजन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. येथील कठोरा रोड स्थित पोटे कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे मंत्री गोरे यांच्या उपस्थितीत ‘जलसमृद्ध गाव’ विषयावरील कार्यशाळा आणि उत्कृष्ट ग्रामपंचायतींचे पुरस्कार वितरण पार पडले. यावेळी ते बोलत होते. मंचावर आमदार प्रवीण पोटे, संजय खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, गजानन लवटे, केवलराम काळे, उमेश यावलकर, राहुल कुल (बुलढाणा जिल्हा), राजू तोडसाम (यवतमाळ जिल्हा) व सई डहाके (कारंजा घाडगे), ग्राम विकास व पंचायतराज विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी आदी उपस्थित होते. गोरे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. या सकारात्मकतेतून भविष्यात विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यांच्यामते देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. प्रारंभी ग्राम विकास व पंचायतराज विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार आणि राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक तथा यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सदर योजना तसेच जलताराचे संशोधक डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी जलसंधारणाबद्दल मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री यांच्या नावे सुरु असलेल्या या अभियानात राज्यातील ५ हजार ६४४ गावांनी सहभाग घेतला. यातील ४ हजारहून अधिक ग्रामपंचायतींनी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करून सीसीटीव्ही यंत्रणा उभारली. स्त्रोतांचे बळकटीकरण करून ६५ लाख वृक्षलागवड करण्यात आली. मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते यावेळी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानचे पुरस्कारही वितरित करण्यात आले. विभागीय स्तरावर पार्डी (ता. मोर्शी) ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांकाचे ८० तर एरंडगाव (ता. नांदगाव खंडेश्वर) ग्रामपंचायतने ६० लाख जिंकले. जिल्हास्तरावर ५० लाख रुपयांचा पहिला क्रमांकघोडसगाव, ता. अंजनगाव सुर्जी, ३० लाख रुपयांचा दुसरा क्रमांक बेलोरा, ता. चांदुरबाजार आणि२० लाख रुपयांचा तिसरा क्रमांक देवगाव, ता. अचलपूर या ग्रामपंचायतींना पटकावला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *