![]()
कृषी सेवा केंद्रांसमोर लागणाऱ्या लांबच लांब रांगा, खताच्या एका गोणीसाठी उन्हातान्हात होणारी पायपीट आणि वारंवार होणारी हुज्जत… हे दर हंगामात बळीराजाच्या पाचवीला पूजलेले चित्र आता इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत. बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ‘एफएफएस’ (फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल) ही नवी डिजिटल प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामुळे आता घरबसल्या मोबाईलवरूनच खतांचे आगाऊ बुकिंग करता येणार आहे. {यंदा रब्बी हंगामासाठी २०% अधिक खतांचा साठा : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा रब्बी हंगामासाठी २०% अधिक खतांचा साठा अतिरिक्त उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. खत वितरणावर परिणाम : दुष्काळामुळे लागवडीखालील क्षेत्र घटणार असल्याने रब्बी हंगामात प्रत्यक्ष खतांचा वापर आणि उचल अपेक्षेपेक्षा खूपच कमी होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, यंदाच्या हंगामात खतसाठा शिल्लक राहण्याची चिन्हे असून, एकूण उलाढालीत मोठी घट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. {अॅप डाऊनलोड : शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये अधिकृत ‘एफएफएस’ (FFS) अॅप घ्यावे लागेल. {माहिती भरणे : अॅपमध्ये शेतजमिनीचा तपशील, आवश्यक कागदपत्रे आणि पिकांच्या गरजेनुसार लागणाऱ्या खतांची नोंद करावी लागेल. {क्यूआर कोड जनरेट : नोंदणी पूर्ण झाल्यावर मोबाईलवर डिजिटल पावती आणि ‘क्यूआर कोड’ मिळेल. {थेट उचल : हा कोड खतविक्रेत्याला दाखवून हक्काचे खत घेता येईल. ^एफएफएस प्रणालीमुळे खत वाटपात पारदर्शकता येईल. शेतकऱ्यांचा वेळ वाचावा आणि गैरप्रकार थांबावेत हाच हेतू आहे. शेतकऱ्यांना अॅप वापरताना अडचण आल्यास त्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. – किरणकुमार शिंदे, कृषी अधिकारी.
Source link
आता खतासाठी मोबाईलवरून करता येणार आगाऊ बुकिंग:बागलाणमध्ये ‘एफएफएस’ प्रणाली लागू; क्यूआर कोड दाखवा अन् खत घेऊन जा, शेतकऱ्यांना अवाहन