Headlines

आदर्श महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी:स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राममध्ये द्वितीय क्रमांक‎




प्रतिनिधी । दर्यापूर शिक्षणासोबतच सामाजिक जाणीवा व जबाबदारीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवणाऱ्या स्टुडंट पोलिस कॅडेट (एसपीसी) प्रोग्राम अंतर्गत आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले. या शैक्षणिक वर्षात प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल शाळेला अमरावती ग्रामीण पोलीस विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. या यशाबद्दल ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या हस्ते आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज देशमुख यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, समाजभान राष्ट्रीय मूल्यांची जपणूक करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात शाळेने केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. प्राचार्य मनोज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासन वर्ग,शिक्षक-शिक्षिका व संपूर्ण आदर्श परिवाराने सातत्यपूर्ण प्रयत्न करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली. या यशामागे शिक्षकांचे समर्पण, विद्यार्थ्यांची मेहनत आणि शाळेची शैक्षणिक परंपरा यांचा मोठा वाटा आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल प्राचार्य मनोज देशमुख, प्रशासन वर्ग,सर्व शिक्षक-शिक्षिका व आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संपूर्ण परिवाराचे सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन होत असून, भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी घडत राहो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *