Headlines

आमची सत्ता येऊ द्या, पक्ष कसे फुटतात ते दाखवून देऊ:संजय राऊतांचा भाजपला इशारा, जयंत पाटलांच्या विमान प्रवासावरही लगावला टोला




ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधान मोदींसोबतची नियोजित भेट, राज्यात झालेले पक्षांतर आणि जयंत पाटील यांच्या विमान प्रवासाच्या मुद्द्यांवर राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि खोचक शब्दांत उत्तरे दिली. सत्ता गेल्यावर भाजपची अवस्था ‘माचीसच्या रिकाम्या बॉक्ससारखी’ होईल, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. पवार गटाच्या मोदी भेटीत आश्चर्य काय? शरद पवार गटाचे खासदार आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत, यावर बोलताना राऊत म्हणाले, “देशाचे गृहमंत्री मुंबईपासून काश्मीरपर्यंत फिरतात, पण संसदेत बसत नाहीत. पंतप्रधान मोदीही संसदेत येत नाहीत. मग खासदारांना आपले प्रश्न घेऊन त्यांना भेटायला जावे लागते, यात आश्चर्य काय? हे खासदार लपूनछपून भेटत नसून रीतसर वेळ काढून भेटत आहेत.” या भेटीमुळे विरोधी पक्षाच्या प्रतिमेला तडा जातोय का? यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “माझे सुप्रिया सुळेंशी बोलणे झाले आहे. हा पक्ष कोणत्याही परिस्थितीत ‘इंडिया’ ब्लॉकच्या विरोधात भूमिका घेणार नाही किंवा एनडीएला मदत करणार नाही. तसेच परिसीमन राष्ट्रहितासाठी योग्य नसून, शरद पवार किंवा सुप्रिया सुळे याला कधीही पाठिंबा देतील असे मला वाटत नाही.” “पक्ष कसे फुटतात, हे आमची सत्ता आल्यावर दाखवून देऊ” शिवसेना (ठाकरे गट) पंतप्रधानांची भेट का घेत नाही? या प्रश्नावर राऊत संतापले. ते म्हणाले, “आम्ही त्यांना भेटायला जाणार नाही, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्यांनी आमचा नुसता पक्ष फोडला नाही, तर तो एका ‘ऐऱ्यागैऱ्याच्या’ हातात दिला ज्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. आमची सत्ता येऊ द्या, पक्ष कसे फुटतात हे आम्ही पण दाखवून देऊ. ज्या दिवशी यांची सत्ता जाईल, त्या दिवशी आपोआप ८० टक्के भाजप रिकामी होईल. सत्ता काय करू शकते, हे तेव्हा त्यांना कळेल. कोणतीही कृती न करता भाजपा एका माचीसच्या रिकाम्या बॉक्ससारखी होईल.” “विमानात ते असतील, तर मी काय उडी मारू का?” राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत एकाच विमानातून प्रवास केला. यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. या प्रश्नावर राऊत यांनी आपल्या खास शैलीत टोला लगावला. “एकाच विमानातून प्रवास केला म्हणून काय झाले? उद्या जर माझ्या विमानात फडणवीस आणि नार्वेकर एकत्र असतील, तर मी काय विमानातून खाली उडी मारू का?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. हेही वाचा.. मुख्यमंत्र्यांच्या गाडीत-विमानात बसण्याची इच्छा प्रत्येकाचीच:जयंत पाटलांच्या मनात आता योग्य विचार येतील, अंबादास दानवे मूळचे स्वयंसेवकच- नीतेश राणे मुख्यमंत्र्यांच्या गाडीत किंवा विमानात बसण्याची इच्छा आज प्रत्येकाचीच असते. ‘देवाभाऊंचा’ संवाद लाभणे म्हणजे एक प्रकारे आपले भविष्य घडवण्यासारखे आहे. विमानातील या प्रवासानंतर निश्चितच जयंत पाटलांच्या मनात योग्य आणि सकारात्मक विचार येतील, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *