पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी भेटायला जाण्यामध्ये काहीही गैर किंवा वावगे नाही. मलाही मुख्यमंत्री म्हणून विरोधी पक्षाचे अनेक नेते भेटत असतात आणि कामे सांगत असतात; त्यामुळे या भेटींकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची अजिबात गरज नाही, असे स्पष्ट मत देवें
.
केंद्र सरकारच्या एफसीआरए (FCRA) विधेयकाबाबत स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकार कोणत्या एका समुदायाच्या किंवा धर्माच्या विरोधात नाही. परदेशातून मिळणाऱ्या निधीचा (फंड) उपयोग काही संस्थांकडून देशविरोधी कृत्यांसाठी केला जात आहे, त्याला आळा घालणे आवश्यक आहे. जे चांगले काम करतात त्यांच्यासाठी यात कोणतीही अडचण नाही. ज्या संस्था नियमानुसार हिशोब देतील, त्यांचे परवाने कायम राहतील. ज्यांना यावर काही बोलायचे असेल ते संसदेत त्यावर चर्चा करू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.हे बिल काही कोणत्या एका समुदायाच्या विरोधात नाही. हे काही एका धर्माच्या संस्थेसाठी नाही तर ज्यांना बाहेरुन फंड येतो त्यांच्यासाठी हे गरजेचे आहेच.
देशभरात तिरंगा रॅली
स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशभरात ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या रॅलींच्या माध्यमातून देशभरात देशप्रेमाचे वातावरण निर्माण व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आज मुंबईत, तर उद्या पुण्यात या रॅली पार पडणार असून 14 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील रॅलीत मी स्वतः उपस्थित राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
गडचिरोलीतील घटनेची सविस्तर माहिती मागवली
गडचिरोली जिल्ह्यातील निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या घटनेची माहिती मला मिळाली असून यासंदर्भातील अधिकची आणि सविस्तर माहिती मी प्रशासनाकडून मागवली आहे.
हे ही वृत्त वाचा 25 दिवसांतील चौथी भेट!:सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात शरद पवार गटाचे 8 खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार; कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे आज पक्षाच्या आठ खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. पक्षाच्या खासदारांसह पंतप्रधानांची अशी सामूहिक भेट पहिल्यांदाच होत असल्याने या भेटीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या बैठकीत मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामे, राज्यातील पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी, विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच विविध लोकहिताचे विषय मांडले जाणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.