Headlines

आयशरमुळे अजिंठा घाटात तीन तास वाहतुकीची कोंडी:घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लागल्या रांगा‎




अजिंठा घाटात एक आयशर ट्रक रस्त्यालगतच्या नालीत जाऊन बंद पडल्याने रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली. सुमारे तीन तास रस्ता अडकून पडल्याने घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक (एमएच २० ईजी ४३५६) रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अजिंठा घाटातून जात होता. घाट चढताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यालगत असलेल्या नालीत जागेवरच बंद पडला. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली. फर्दापूर ठाण्याचे फिरोज तडवी, गवळी, स्वप्निल चव्हाण, होमगार्ड दिनांक कारण व कोंडीचा वेळ १६ मार्च ट्रक नादुरुस्त – १ तास २४ मार्च ट्रकचा अपघात -४ तास २५ मार्च अपघात- ८ तास २९ मार्च अपघात- ३ तास १ एप्रिल दुहेरी अपघात- १ तास १० एप्रिल टँकर नादुरुस्त- ३ तास ८ मे बस-ट्रक धडक- ४ तास १० मे ॲपेचा अपघात-१ तास १ जून ट्रकची धडक- ३ तास ९ ऑगस्ट आयशर नालीत – ३ तास पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. पाच महिन्यांत १० वेळा घाटामध्ये वाहतूक ठप्प



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *