Headlines

आस्मानी संकट:पावसाअभावी हरभरा पेरणीत घट, यंदा फक्त 10% क्षेत्रावरच पेरा, पावसाअभावी पाणी नसल्याने खरिपानंतर रब्बीवरही घाला




यंदा पावसाने पाठ फिरवल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामातील पिकांना पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामही वाया जाण्याची वेळ आली आहे. पाण्याअभावी जमिनीची पुरेशी ओल टिकून न राहिल्याने शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा पेरणी क्षेत्रात तब्बल ९०.१६ टक्क्यांनी घट झाली आहे. गतवर्षी हरभरा पिकाची पेरणी ६ लाख १९ हजार ३०५ क्षेत्रावर झाली होती.त्यावेळी पेरणीची टक्केवारी १०४.२५ टक्के इतकी होती.मात्र,यंदा पावसाचे प्रमाण घट झाले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी हरभरा पेरणीचे क्षेत्र अवघे १० हजार ५४६ इतके असून,पेरणीची टक्केवारी केवळ १४.९ टक्क्यांवर आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा पेरणी क्षेत्रात ९०.१६ टक्क्यांची मोठी घट नोंदवण्यात आली आहे.सदर हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असून,शेतकऱ्यांना कमी पाण्यातही चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा असते.मात्र,यंदा जमिनीत ओलावा नसल्याने पेरणी करणेही कठीण झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी पेरणी न करण्याचा निर्णय घेतला आहे.तर काहींनी पेरणी करूनही पाण्याअभावी पिके वाचविण्याची चिंता व्यक्त केली आहे.सध्या हरभरा पेरणी क्षेत्रात झालेली ही मोठी घट भविष्यात बाजारपेठेवरही परिणाम करणारी ठरू शकते. हरभरा उत्पादन घटल्यास हरभरा डाळीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरणपोळी तयार करण्यासाठी लागणाऱ्या हरभरा डाळीचे दर वाढल्यास सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या हाताला उत्पादन नाही, तर दुसरीकडे ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. डाळीचे दर वाढण्याची शक्यता यंदा पावसाने सुरुवातीपासूनच ओढ दिल्याने खरीप हंगाम हातचा गेला. रब्बी हंगामात हरभरा पेरणी करण्यासाठी जमिनीत ओलावा नसल्याने अनेक शेतकऱ्यांना पेरणीच करता आली नाही. गतवर्षी चांगले उत्पादन मिळाले होते; मात्र यंदा पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यामुळे हरभऱ्याचे उत्पादन घटून बाजारात डाळीचे दर वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे नुकसान आणि ग्राहकांच्या ताटातील महागाई,अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. -गुरुराज तागडे, नरखेड उपलब्ध पाण्याच्या नियोजनातून पेरणी यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जमिनीत अपेक्षित ओलावा निर्माण झालेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा पेरणीवर मोठा परिणाम झाला आहे. हरभरा पिकाच्या उगवणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.मात्र, पाण्याची उपलब्धता कमी असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी टाळली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा पेरणी क्षेत्रात मोठी घट दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून जमिनीतील ओलाव्यानुसार पेरणीचा निर्णय घ्यावा. -हर्षद निगडे, कृषी अधिकारी, मोहोळ.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *