Headlines

भिलाला समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न ऐरणीवर:अडचणी दूर करण्याची मागणीसाठी निवेदन




भिलाला समाजाचा अनुसूचित जमातीचा प्रवर्गात समावेश असतानाही मेळघाटातील समाजबांधवांना जात प्रमाणपत्र मिळवताना अनेक अडचणी येत आहेत. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भिलाला समाजाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष रवि राणा यांना निवेदन देण्यात आले आहे. जुन्या काळातील आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसणे, गृहचौकशी प्रक्रियेतील अडचणी आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे अनेक पात्र अर्जदारांना जात प्रमाणपत्र मिळत नसल्याची बाब निवेदनातून मांडण्यात आली. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती आणि नोकरीच्या संधींवर होत आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यातही अडचणी निर्माण होत आहेत. पात्र अर्जदारांना नियमानुसार जात प्रमाणपत्र देण्यात यावे, महसूल विभागातील उपलब्ध नोंदींच्या आधारे प्रकरणांची तपासणी करावी आणि सेतू केंद्रांमध्ये भिलाला समाजाचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात यावेत, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. हा प्रश्न शासन स्तरावर मांडून संबंधित विभागाकडून योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा समाजबांधवांनी व्यक्त केली. जात प्रमाणपत्राचा प्रश्न मार्गी लागल्यास समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. त्यामुळे शासनाने या मागणीची दखल घेऊन पात्र समाजबांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *