![]()
कर्जतच्या सह्याद्रीच्या कुशीत टॉरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीविरोधात आणि प्रशासनाने लादलेल्या इंटरनेट बंदीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे थेट मैदानात उतरले आहेत. बुधवारी सकाळी बाधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सायंकाळी कर्जत येथील पोलिस मैदानावर आयोजित जाहीर सभेत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “इंटरनेट बंद करून सत्य जगापासून लपवता येणार नाही,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. अशा प्रकारे दडपशाही करून सरकार नेमके काय साध्य करू पाहत आहे, असा सवालही त्यांनी केला. पर्यावरणाचा ऱ्हास आणि केंद्राच्या हस्तक्षेपावर सवाल टॉरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी होत असलेल्या बेसुमार जंगलतोडीवर तीव्र नाराजी व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, सह्याद्रीच्या कुशीत शेकडो वर्षांपासून उभी असलेली समृद्ध झाडे आणि पर्यावरण एका झटक्यात नष्ट केले जात आहे. महाराष्ट्रातील जमिनी आणि जंगलांबाबतचे निर्णय नेमके कोण घेत आहे, असा सवाल उपस्थित करत केंद्रातील नेतृत्वाच्या दबावाखाली राज्यात जनतेच्या हिताचे नसलेले प्रकल्प लादले जात असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला.
Source link
इंटरनेट बंद करून सत्य जगापासून लपवता येणार नाही- राज ठाकरे:कर्जतमधील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल