Headlines

उपवर्गीकरण विरोधात तिवस्यात बैठक, 17 जूनच्या मोर्चात सहभागाचा निर्धार:अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार महामोर्चा




तिवसा येथे अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत शासनाच्या उपवर्गीकरण निर्णयाचा निषेध करण्यात आला. तसेच, १७ जून रोजी अमरावती येथे आयोजित महामोर्चात सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. रहिवाशांनी उपवर्गीकरण हे आरक्षणाविरुद्धचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या तत्त्वांना धक्का पोहोचत असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. १७ जून रोजी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व आंबेडकरी जनता, आंबेडकरवादी राजकीय पक्ष, धार्मिक संघटना, सामाजिक संघटना आणि चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने हा केवळ मोर्चा नसून, आंबेडकरी चळवळीच्या एकजुटीचा आणि सामूहिक शक्तीचा निर्धार असल्याचे म्हटले आहे. भविष्यातही या अन्यायकारक निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे समितीने स्पष्ट केले. या बैठकीला रविकांत गवई, सुधाकर तलवारे, रमेश कटके, नयन मोंढे, नगरसेवक धनराज थुल, नगरसेवक आशिष ढोले, प्रशांत कांबळे, पुरुषोत्तम मेश्राम, संदीप चक्रनारायण, संदीप दहाट, जगदीश माहोरे, गजानन रामटेके, भारत दहाट, देवेंद्र खाकसे, जानराव मनोहर, जनार्दन शेंडे, पद्माकर खाकसे, सतीश यावले, भाष्कर काळे, प्रफुल मकेश्वर, भारत खाकसे, शिवा शापामोहन, विजय यावले, अंकुश कस्तुरे आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *