Headlines

उभ्या नादुरुस्त ट्रकला कार धडकल्याने 2 ठार:मृतांमध्ये सिल्लोडचा एक जण, जळगाव मार्गातील गाडेगाव घाटात अपघात; 3 चुलतभाऊ गंभीर




जळगाव-नेरी महामार्गावरील गाडेगाव घाटात वळणावर उभ्या नादुरुस्त ट्रकला भरधाव कारने (एमएच १९ ईपी ९०६६) धडक दिल्याने छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील एका व्यक्तीसह दोघांचा मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात गुरुवारी सायंकाळी ५ वाजता झाला. धडकेनंतर कार पलटी झाल्याने गाडीचा चुराडा झाला. मृतांमध्ये कारचालक इस्रायल इरफान शेख (२१, रा. पिंपळदरी, ता. सिल्लोड) व पंकज हरीष बेंडवाल (३४, रा. इंदूर) यांचा समावेश आहे. तर, प्रदीप ओमप्रकाश परदेशी, अनुज रामावत परदेशी, गौरव राजू परदेशी व गिरीष योगेश चव्हाण (सर्व रा. खेडी, जळगाव) हे गंभीर जखमी आहेत. हे सर्व जण कंस्ट्रक्शन व्यवसायाच्या निमित्ताने जळगावहून निघाले होते. स्थानिकांनी क्रेनने पत्रा वाकवून सर्वांना कारमधून बाहेर काढले. पंकजच्या मृत्यूने अवघ्या ६ महिन्यांची मुलगी पोरकी मृत पंकज बेंडवाल हा मूळचा जळगावचा रहिवासी आहे. मार्केटिंगच्या कामामुळे तो सध्या इंदूर (मध्य प्रदेश) येथे स्थायिक झाला आहे. ३ दिवसांपूर्वीच तो जळगावात आला होता. त्याला ६ महिन्यांची मुलगी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *