Headlines

एल निनोवर मात करत शेतीचे नियोजन करा:नन्हेगाव येथील बैठकीतून अधिकाऱ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎




आगामी खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर नन्हेगाव (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांसाठी विशेष ‘खेत बचाव अभियान २०२६’ कार्यक्रमात मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संभाव्य ‘एल निनो’च्या प्रभावाचा सामना करण्यासाठी आणि खरीप पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ याविषयी बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच कृषी औजारे, ठिबक सिंचन आणि इतर विविध अनुदानांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा, याची सोपी आणि सविस्तर प्रक्रिया यावेळी प्रात्यक्षिकासह समजावून सांगण्यात आली. विविध अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी पोर्टल’वर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याशिवाय, कमी किंवा जास्त पावसाच्या परिस्थितीतही पिकांचे रक्षण करण्यासाठी ‘रुंद वरंबा सरी’ (बीबीएफ) आणि टोकण पद्धतीने पेरणी करण्यावर भर देण्यात आला. हवामानातील बदलांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धत बदलून जोखीम कमी करण्यासाठी एकापेक्षा जास्त पिके एकत्र घेण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सहाय्यक कृषी अधिकारी रोहित थोरात, गणेश सावळे, सहाय्यक कृषी अधिकारी किरण नलावडे व सुशील पाटील, मंडळ कृषी अधिकारी हनुमंत ढोले व कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ समाधान जवळगी व मंडळ कृषी अधिकारी हनुमंत ढोले प्रमुख शास्त्रज्ञ उपस्थित होते. रोपाची उगवण क्षमता वाढवण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया आवर्जून करावी, असे सांगण्यात आले. बैठकीमध्ये उपस्थित शेतकऱ्यांना पिकांची उगवण क्षमता वाढवण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षणासाठी ‘बीजप्रक्रिया मोहीम’ म्हणून राबवण्याचे आवाहन करण्यात आले. पद्धती बदलण्याचे आवाहन



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *