Headlines

ओपीडी 25 वरून थेट 80 वर; साथीची रुग्ण संख्याही तिप्पट:डेंग्यू, चिकन गुनिया, थंडीतापाच्या आजारांचा विळखा‎




शहरासह जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारांनी थैमान घातले असून घरोघरी विविध आजारांनी ग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत. सतत बदलणारे हवामान, ऊन-पावसाचा खेळ, रात्री वाढणारी थंडी आणि दिवसा वाढलेले तापमान, डासांसह इतर किटकांची संख्या वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया तसेच थंडी-तापासारख्या साथीच्या आजारांनी जिल्ह्यात कहर केला आहे. जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या तीन पटींनी वाढली असल्याचे रुग्णालयातील आकडेवारीवरुन समोर येत आहे. सरकारी व खासगी हॉस्पीटलमध्ये रुग्णांची गर्दी वाढली असून जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विनच्या) ओपीडीत आधी दररोज २५ रुग्ण उपचारासाठी यायचे, तेथे आता ७० ते ८० रुग्ण येत आहेत. जिल्हा हिवताप विभागाने दिलेल्या महितीनुसार केवळ सप्टेंबर महिन्यात तपासण्यात आलेल्या ७०९ नमुन्यांपैकी जिल्ह्यात ८१ रुग्ण डेंग्यूबाधित आढळले आहेत. बाधित रुग्णांची संख्या याच प्रमाणात वाढत राहिली तर डिसेंबर २०२६ पर्यंत १७९ पॉझिटीव्ह रुग्ण आढळण्याचा अंदाज जिल्हा हिवताप विभागाने वर्तवला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला जुलैमध्ये डेंग्यूचे केवळ २ रुग्ण आढळले होते. ऑगस्टमध्ये ही संख्या १८ पर्यंत वाढली. डेंग्यूसह चिकन गुनिया, मलेरिया व इतर आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. बचावासाठी काय काळजी घ्यावी? पाण्याच्या टाक्या, कुंड्या व छतावरील भंगार साहित्यातील पाणी आठवड्यातून एकदा कोरडे करणे आवश्यक असून स्वच्छतेवर जास्त भर द्यावा. घरात डास प्रतिबंधक जाळ्या व मच्छरदाणीचा नियमित वापर करा. पिण्यासाठी पाणी उकळून प्यावे आणि बाहेरील उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. हवेतील बदलांमुळे साथरोगांचा प्रसार ^सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होतो. यासाठी मनपातर्फे विशेष तपासणी मोहिम राबवण्यात येत आहे. तरीही सलग दोन दिवसांपेक्षा जास्त ताप, शरीर दुखणे, कणकण, उलटी, मळमण्, शरीरावर पुरळ उठल्यास उपचार करून घ्यावेत. – डॉ. विशाल काळे, (वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *