Headlines

ओबीसींना न्याय मिळालाच पाहिजे:जनगणनेच्या मागणीसाठी गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसचे राज्यभर धरणे आंदोलन, वडेट्टीवारांचा सरकारला इशारा




राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता सरकारने कुंभमेळा आणि शक्तीपीठ महामार्गासारखे प्रकल्प बाजूला ठेवून शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत केली पाहिजे. “एक वर्ष कुंभमेळ्यात डुबकी नाही मारली तरी चालेल, पण आधी बळीराजाला जगवा,” असा टोला काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य बजावत वडेट्टीवार यांनी स्वतःच्या एका वर्षाच्या आमदारकीचा पगार मुख्यमंत्री दुष्काळ निधीत जमा करण्याची मोठी घोषणा केली आहे. नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांची भेट आणि दुष्काळावर उपाययोजनांची मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सविस्तर निवेदन दिले. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना कोणताही दुजाभाव न करता तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली. परिस्थिती अधिक गंभीर होण्यापूर्वी सरकारने ठोस पावले उचलावीत. कुंभमेळा किंवा शक्तीपीठ महामार्गावर मोठा निधी खर्च करण्याऐवजी तो निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वळवावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. तसेच, गरज पडल्यास पुढील वर्षाचा निधीही देण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी जनगणनेसाठी राज्यभर धरणे आंदोलन महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ओबीसी समाजाला न्याय मिळावा आणि जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना (कॉलम) असावा, या मागण्यांसाठी आज राज्यभरात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. यासोबतच, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी ‘महाज्योती’ला एक हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, स्वाधार योजनेचा लाभ द्यावा आणि एससी-एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे तालुकास्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठीही वसतिगृहे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. पार्थ पवार आणि CJP आंदोलनावर स्पष्ट भूमिका पार्थ पवार यांच्याशी संबंधित प्रकरणावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. मात्र, सरकारच्या दबावामुळे ही कारवाई झाली नाही. कायद्यापुढे सर्व समान असून कोणालाही राजकीय संरक्षण मिळू नये, असे ते म्हणाले. तसेच, CJP आंदोलनाच्या निधीबाबत होणाऱ्या आरोपांवर त्यांनी सरकारला आव्हान दिले. “राज्यात आणि केंद्रात तुमचेच सरकार आहे. जर परदेशातून निधी येत असेल तर त्याची चौकशी करा, केवळ आरोप करून काय उपयोग?” असा सवाल त्यांनी केला. संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारावर गदा आणून सरकारने आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करू नये, असेही वडेट्टीवार यांनी सुनावले. हेही वाचा.. दिवेआगर दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार आक्रमक:म्हणाले- 8 विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? सरकार लोकांच्या जीवाशी खेळतंय; कुटुंबांना तातडीने मदतीची मागणी कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (1 ऑक्टोबर) अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. किनाऱ्यांवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यानेच निष्पाप मुलांचा बळी गेल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *