![]()
आभाळाकडे डोळे लावून बसलोय साहेब, पण पाऊस काही येईना… पिकांनी जिभा बाहेर काढल्यात, अन् आमच्या तोंडचा घास पळवलाय! कन्नड तालुक्यातील एका हवालदिल शेतकऱ्याचे हे उद्गार आज संपूर्ण तालुक्याची व्यथा मांडत आहेत. ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने आणि गेल्य
.
कन्नड तालुक्यात १ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. यामध्ये ४४ हजार हेक्टरवर मका आणि ३९ हजार हेक्टरवर कापसाची लागवड आहे. तालुका कृषी अधिकारी संदीप सिरसाठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकर्यांना बिियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीसाठी हेक्टरी सरासरी २५ हजार रुपयांचा खर्च आला आहे. म्हणजेच तालुकभरात शेतकऱ्यांनी जवळजवळ २०० कोटींची गुंतवणूक केली आहे. परंतु, चापानेर, औराळा आणि जेहूर महसूल मंडळात पिके अक्षरशः वाळून गेल्यात जमा आहेत, तर नागद, चिंचोली लिंबाजी आणि पिशोर परिसरातील पिके करपू लागली आहेत. तालुक्यातील ७५ टक्के लागवड क्षेत्र कोरडवाहू असल्याने पावसाचा हा खंड शेतकाऱ्यांसाठी काळ ठरत आहे. तालुक्यातील या भीषण परिस्थितीची दखल घेऊन शासनाने पंचनामे करावेत व बियाणे आणि खतांसाठी शेतकाऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे, डॉ. तृप्ती राजपूत आणि डॉ. दिलीप राजपूत यांनी केली. पाऊस न झाल्यास दुष्काळ जाहीर करण्याची वेळ येईल, अशी शक्यता आहे.
प्रकल्प कोरडेठाक; नद्यांना नाही पाणी चालू पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात १० पैकी ९ मंडळांमध्ये पावसाची प्रचंड तूट नोंदवण्यात आली आहे. नागद येथील गडदगड प्रकल्प वगळता तालुक्यातील शिवना टाकळी, अंजना पळशी, निंभोरा, वडनेर आणि वाघदरा हे सर्व लघु व मध्यम सिंचन प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. कन्नड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी मध्यम प्रकल्पासह सातकुंड, गणेशपूर, हिवरखेडा, गौताळा आणि वडोद प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. शिवना, अंबाडी, पूर्णा आणि अंजना या मुख्य नद्यांच्या पात्रातून पाण्याचा एक थेंबही वाहिलेला नाही, अशी खंत हतनूर येथील शेतकरी सुनील अकोलकर यांनी व्यक्त केली.