![]()
बोरगाव बाजार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुकारलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ सिल्लोड तालुक्यातील म्हसला फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी १ तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सिल्लोड-कन्नड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. म्हासला खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच सुखदेव सपकाळ हे आंदोलनाचे आयोजक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने म्हासला फाटा येथे एकत्र आले. आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भराडी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण काकडे, ज्ञानेश्वर तायडे, डॉ. प्रकाश गोराडे, काशीनाथ गोराडे, जगदीश कवाळ, ज्ञानेश्वर सखरे यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलकांच्या वतीने प्रशासनास मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला शासनाने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. एक तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवेदन दिल्यानंतर आंदोलन शांततेत समाप्त करण्यात आले.
Source link
मराठा आरक्षण:म्हसला फाट्यावर एक तास रास्ता रोको; सिल्लोड-कन्नड महामार्गावर वाहतूक ठप्प, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांकडे वेधले लक्ष