Headlines

कळंबा पाटी जवळ भीषण अपघात:3 प्रवाशांचा मृत्यू तर 5 गंभीर जखमी, जखमींवर परभणीत उपचार सुरू; मृतांची ओळख पटविण्याचे काम वेगात




औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर कळंबा पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव वाहनाने ऑटोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी ता. 7 दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातातील मयत व जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औढा नागनाकडून काही प्रवासी एका ॲटोने (एमएच-२२-एपी-२१४९) परभणीकडे निघाले होते. त्यांचा ॲटो औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर कळंबा पाटी जवळ आल्यानंतर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहने त्यांच्या अॅटोला धडक दिली. या अपघातानंतर ॲटो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले अन ॲटो रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन १०८ रुग्णवाहिका बोलावली. या रुग्णवाहिकेद्वारे सहा जणांना उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले. मात्र त्यापैकी एका महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाला तर पाच जखमींना उपचारासाठी परभणीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोन जखमी अत्यावस्थ असून इतर तीघे बोलण्याच्या मनःस्थितीत नाहीत. या शिवाय घटनास्थळावर दोन बालकांचा मृ्त्यू झाला असून त्यापैकी तीन वर्षाची मुलगी व एक बारा वर्षाचा मुलगा आहे. दोघांचेही मृतदेह हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सिद्दीकी यांनी सांगितले. हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरकर, उपनिरीक्षक संजय केंद्रे, जमादार हिरामण चव्हाण, कृष्णा चव्हाण यांच्या पथकाने भेट दिली आहे. या अपघाताची मयतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *