![]()
नाशिकचा कांदा वर्षातून दोन वेळा आमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणतो. पण दर कमी राहिल्यास वर्षभर ताे शेतकऱ्यांच्या डाेळ्यांमध्ये अश्रू आणताे. अशा स्थितीत नाशिकमधील कार्यक्रमांमध्ये आम्हाला अनेकदा कांदे भेट म्हणून मिळतात. मात्र सध्या कांदा महाग असल्याने कुणी या कार्यक्रमात कांदे घेऊन आले नाही. ती भेट मिळाली असती तर नक्कीच घरी नेली असती. शेतकऱ्यांच्या कष्टाचा पूर्ण आदर असून कांद्याच्या भावांमधील माेठे चढउतार राेखण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र यंत्रणा उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत अाहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये दिली. दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे मराठा विद्याप्रसारक समाज (मविप्र) शिक्षण संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात कांद्याच्या उंचावलेल्या दरांवर आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर संवाद साधला. नाशिकचा कांदा आणि लासलगाव बाजार समिती देशात प्रसिद्ध असल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, “सध्या कांद्याला चांगले भाव मिळत असल्याने कुणी भेट आणली नाही. शेतात अहोरात्र काबाडकष्ट करूनही शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही, तर शेतकऱ्यांचे दुःख अनावर होते. त्यांच्या मेहनतीला सन्मान मिळावा.
Source link
कांदा दर नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा आणू:नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री मिश्किलपणे म्हणाले, यंदा कांदा भेट मिळाला नाही