![]()
शहरातील चांदापूर रोडवरील एका पेट्रोलपंपाजवळ राजकीय वैमनस्यातूनकार्यकर्त्यावर कोयता व लोखंडी रॉडनेप्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली.यात कार्यकर्त्याचे दोन्ही हात व दोन्ही पायफ्रॅक्चर झाले आहेत. डोक्याला गंभीरदुखापत झाली. हल्ला सुरू असताना मुख्यसूत्रधार नगरसेवकाने थेट व्हिडिओ कॉलकरून “मुंडके माझ्याकडे घेऊन या,” असाआदेश हल्लेखोरांना दिला. याप्रकरणीपरळी शहर ठाण्यात पीडित अभिजीतकांबळे याच्या जबाबावरून परळी शहरपोलिसांनी नगरसेवक नितीन रोडे तसेचआनंद विलास कांबळे, सुरेश चौंडे, रतनआदोडे, संतोष इंदरकर ऊर्फ बन्नी, रोहनऊर्फ गब्बर साळवे, दत्ता कुरूप व इतर ३अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. अभिजित नागेश कांबळे (२९, रा.भीमनगर, परळी वै.) हा युवक परळीशहरात गेल्या ३-४ वर्षांपासून राजकीयकार्यकर्ता म्हणून सक्रिय आहे. १२ जुलै रोजी तो चांदापूर रोडवरील पेट्रोलपंपाजवळील वॉशिंग सेंटरवर दुचाकीधुण्यासाठी ठेवून शेजारच्या चहाच्याहॉटेलवर बसला होता. त्यावेळी जुन्याराजकीय वादाचा राग मनात धरून रतनआदोडे, आनंद कांबळे, सुरेश चौंडे,संतोष इंदरकर ऊर्फ बन्नी, रोहन ऊर्फगब्बर साळवे हे हत्यारांसह तेथे आले.आनंद कांबळे याने अभिजीतच्या डोक्यातलोखंडी रॉड मारला. “याला पकडा.मारून टाका. हा नितीन रोडे साहेबांचाआदेश आहे,” असे तो ओरडू लागला. मारहाण सुरू असतानाच हल्लेखोरांपैकीएकाच्या मोबाइलवर नगरसेवक नितीनरोडे याचा व्हिडिओ कॉल आला.व्हिडिओ कॉलवर नितीन रोडे यानेअभिजीतला अश्लील शिवीगाळ केली.“आता कसं वाटतंय? याच्या पायावरनको. मुंडक्यावर मारा. मुंडकं माझ्याकडेघेऊन या,” असा थेट आदेश त्याने दिला.या आदेशानंतर सुरेश चौंडे याने लोखंडीरॉड थेट अभिजीतच्या डोक्यात मारला.त्यामुळे तो जागीच कोसळला. अभिजीतनिपचित पडल्याचे पाहून आरोपीगाड्यांवर बसून पसार झाले. हल्ल्यात तरुणाचे दोन्ही हात व दोन्ही पाय फ्रॅक्चर
अभिजीतचे मित्र हनुमान झोडगे वचरण पैठणे यांनी त्याला तातडीनेरिक्षामधून परळीच्या सरकारीरुग्णालयात दाखल केले. तेथेप्राथमिक उपचार झाले. डोक्याला टाकेघालण्यात आले. त्यानंतर पुढीलउपचारासाठी त्याला अंबाजोगाईयेथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातहलवण्यात आले आहे. तेथीलडॉक्टरांनी अभिजीतचे दोन्ही हात वदोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याचे घोषित केले आहे. सध्या त्याच्यावर वाॅर्ड क्र.१३ मध्ये उपचार सुरू आहेत.
Source link
कार्यकर्त्यावर हल्ला; व्हिडिओ कॉलवर नगरसेवक म्हणाला, 'मुंडके घेऊन या':बीडमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह 10 जणांवर गुन्हा दाखल