Headlines

हिंगोली जिल्ह्यात 2 अपघातांत 3 ठार, एक गंभीर‎:अपघातातील मृतांमध्ये पुसदच्या 2 जिम ट्रेनरचा समावेश‎




हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ‎‎अपघातांत तीन जण ठार झाल्याची ‎‎घटना घडली आहे. हिंगोली ते ‎‎कळमनुरी मार्गावर कार अपघातात‎पुसद येथील दोन जिम ट्रेनरचा मृत्यू ‎‎झाला. हिंगोली ते औंढा नागनाथ‎मार्गावर एका पादचाऱ्याचा अज्ञात‎वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्याची‎घटना घडली आहे. तिघांच्या‎मृतदेहावर हिंगोलीच्या शासकीय‎वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी‎सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात‎आली.‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎पुसद येथील परिमल राठोड व त्यांचा‎मित्र उदय गाजरे हे हिंगोली येथील‎एका जिममध्ये प्रशिक्षक म्हणून काम‎करीत होते. गुरुवारी रात्री अकरा‎वाजण्याच्या सुमारास जिम बंद‎झाल्यानंतर परिमल, त्यांचा मित्र‎उदय व अमोल कागणे हे त्यांच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎कारने पुसदकडे जाण्यासाठी निघाले‎होते. त्यांची कार हिंगोली ते‎कळमनुरी मार्गावर शिवणी शिवारात‎आल्यानंतर एका वळणावर‎चालकाचे वाहनावरील नियंत्रण‎सुटले.‎ कार दुभाजकावर जाऊन‎आदळली. कार रस्त्यावरच‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎उलटली. या अपघातात कारचा‎चुराडा झाला. दरम्यान, तिघांची‎वैद्यकीय तपासणी केल्यानंतर‎परिमल व उदय यांचा मृत्यू झाल्याचे‎जाहीर करण्यात आले. या‎अपघातातील गंभीर जखमी अमोल‎यांच्यावर शासकीय रुग्णालयात‎उपचार सुरू आहेत.‎ अज्ञात वाहनाने दिली‎पादचाऱ्याला धडक‎
हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्ता‎येथील शेख अफसर हे शुक्रवारी‎सकाळी मुख्य रस्त्याने जात‎असताना भरधाव वाहनाने त्यांना‎धडक दिली. या अपघातात त्यांचा‎जागीच मृत्यू झाला. मृत शेख‎अफसर यांच्या पश्चात पत्नी मुलगा,‎मुलगी आहे. पोलिस निरीक्षक‎विष्णूकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक राहुल‎घुले आदींनी घटनास्थळी भेट देऊन‎पाहणी केली.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *