Headlines

केआरए ज्वेलर्सने माउलींच्या पालखीसाठी घडवला चांदीचा रथ:आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला, वजन 2.8 टन




संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यासाठी केआरए ज्वेलर्सने शुद्ध चांदीचा एक आधुनिक रथ तयार केला आहे. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधत बनवलेला हा रथ 8 जुलै रोजी पालखी प्रस्थान सोहळ्यात दाखल होईल. या रथाचे वजन कमी केल्यामुळे यंदाच्या सोहळ्यात बैलांना रथ ओढणे अधिक सोपे होणार आहे. केआरए ज्वेलर्सचे विपुल अष्टेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रथाची मजबुती कायम ठेवून त्याचे वजन कमी करणे हे एक मोठे आव्हान होते. यासाठी ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांनी अत्याधुनिक सिल्वर इलेक्ट्रोप्लेटिंग तंत्रज्ञानाचा वापर केला. इपॉक्सी पॉलीस्टर रेझिन आणि कार्बन फायबर बेस यांच्या साहाय्याने या रथाची निर्मिती करण्यात आली आहे. या विशेष तंत्रज्ञानामुळे रथाची मजबुती लोखंडाइतकी भक्कम झाली आहे, तर त्याचे वजन ॲल्युमिनियमप्रमाणे हलके आहे. या नव्या रथाचे एकूण वजन सुमारे 2.8 टन आहे. यामुळे पारंपरिक सौंदर्य कायम राखत रथाचे वजन कमी करण्यात यश आले आहे. रथाच्या निर्मितीमध्ये आळंदी देवस्थानातील शुभ चिन्हांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. रथाच्या अग्रभागी माऊलींच्या मूर्तीसह सूर्य, गरुड, हनुमान आणि जयविजय यांच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी रथावरील आकर्षक आणि पारंपरिक नक्षीकाम केले आहे, ज्यामुळे रथाला धार्मिक परंपरेशी सुसंगत आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाविकांच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि रथाच्या सुरक्षेसाठी त्यावर 10 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच, जीपीएस तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. परंपरेचे जतन करत आधुनिक अभियांत्रिकीचा वापर करून साकारण्यात आलेला हा शुद्ध चांदीचा रथ यंदाच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे एक विशेष आकर्षण ठरेल अशी अपेक्षा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *