![]()
सातारा परिसरातील चाटे स्कूल रोडवरील क्लिफ ऑल डे डायनिंग बेस्पोक हॉस्पिटॅलिटी या हॉटेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत परिमंडळ दोनचे सहायक आयुक्त (अन्न) दयानंद पाटील यांनी हे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांनी ६ तारखेला या हॉटेलची अचानक तपासणी केली असता तेथील कारभार चव्हाट्यावर आला. तपासणीदरम्यान या आस्थापनेला अन्न सुरक्षेच्या मानदंडांनुसार १०६ पैकी केवळ ४८ गुण (४६ टक्के) मिळाले. प्रशासनाने या हॉटेलचा अंतिम निष्कर्ष ‘अनुपालन नाही’ असा नोंदवला आहे. व्यवसाय तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश गंभीर त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हॉटेलमधील अन्न उत्पादन, प्रक्रिया, विक्री आणि ग्राहकांना अन्नसेवा देणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. हॉटेल व्यवस्थापनाने सर्व त्रुटी पूर्णपणे दूर करून अधिकृत फेरतपासणी करून घ्यावी आणि प्रशासनाचा पुढील लेखी आदेश मिळेपर्यंत व्यवसाय सुरू करू नये, असे स्पष्ट केल्याची माहिती सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली. या आढळल्या त्रुटी
Source link
क्लिफ ऑल डे हॉटेलचा परवाना निलंबित:व्हेज-नॉनव्हेज पदार्थ एकत्र, पाणीही दुय्यम; कच्चे, शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवण्याचा नियमही मोडला