Headlines

संतोषीमातानगरात खुनातील आरोपीचा गावठी कट्टा विद्यार्थ्याने मैदानात खड्डा करून लपवला:बीएस्सीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला अटक; पोलिसांनी कट्ट्यासह मॅगझिन केले जप्त



जालना रोडवरील स्क्रॅप व्यापारी अब्दुल बासित हकीम खान यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि कुख्यात गुन्हेगार मुक्या साळवे याचा जवळचा संबंध उघडकीस आला आहे. हर्सूल कारागृहात असलेल्या मुक्या साळवेचा गावठी कट्टा लपवून ठेवणाऱ्या एका १९ वर्षांच्या तर

.

प्रियांशू सतीश खोमणे (१९, रा. मुकुंदवाडी गाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो बीएस्सी प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याच्याकडून मॅगझिनसह एक गावठी कट्टा जप्त करण्यात आल्याची माहिती निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली. विशेष म्हणजे हा कट्टा प्रियांशूने मैदानाच्या भिंतीलगत खड्डा करून लपवून ठेवला होता.

गावठी कट्टा लपवला

हत्या करण्यापूर्वी मुक्याने जालन्यातून एक स्टीलचा गावठी कट्टा आणला होता. खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी आणि जेलमध्ये जाण्यापूर्वी त्याने कट्टा प्रियांशूकडे लपवण्यासाठी दिला होता. एका तरुणाने संतोषीमातानगर येथील मैदानाच्या भिंतीलगत हा गावठी कट्टा लपवला आहे, अशी माहिती अंमलदार संतोष भानुशे यांना मिळाली होती. सहायक निरीक्षक रोहित गांगुर्डे यांनी सापळा रचून संशयित प्रियांशू खोमणे याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.

शस्त्र लपवण्याचा फंडा…

विद्यार्थ्याचा शस्त्र लपवण्यासाठी वापर केल्याचा हा दुसरा प्रकार उघड झाला आहे. ५ महिन्यांपूर्वी एका विद्यार्थ्याच्या दप्तरात कोयता सापडला होता. त्याने रस्त्यात दप्तरातून कोयता काढला होता. तो कोयता त्याच्याकडे लपवून ठेवल्याचे चौकशीत समोर आले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *