![]()
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील बारव असून या बारवेतून संपूर्ण गावातील नागरिकांना तीस वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असे. तसेच या बारवेजवळच मोठा हौद असून या हौदातून जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था केली जात असे. परंतु, नळ योजना आल्यानंतर या बारवेकडे नागरिकांचे व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले होते. यानंतर या बारवेचा उपयोग गणपती विसर्जनासाठी नागरिकांनी केला. त्यामुळे या बारवेचे पाणी पिण्यास अयोग्य झाले व ही बारव हळूहळू बुजत चालली आहे. परंतु, दहा वर्षांपूर्वी खंडाळा परिसरात भीषण पाणीटंचाई भासल्याने ग्रामपंचायतीने २०१६ मध्ये या बारवेमधील पूर्ण गाळ काढला. हा गाळ काढल्यानंतर या बारवेचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील पाणीटंचाई काही प्रमाणात का होईना दूर झाली होती . खंडाळा परिसरातील प्रकल्प कोरडे झाले असल्याने भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. जी बारव दुष्काळी परिस्थितीत संपूर्ण गावाची तहान भागवते तीच बारव अजूनही दुर्लक्षित आहे. पडझड झाली असून बारवेची दुरवस्था झाली आहे. या पुरातन वास्तूचा पुनर्वापर केव्हा मिळणार याकडे खंडाळ्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. बारवेचे विशेष असे की या परिसरातील संपूर्ण बोअरवेल, विहिरींनी तळ गाठला तरी या बारवेमध्ये पाणी असते. येथील मध्ययुगीन काळातील फक्त ही एक बारवच राहिली असून तिचा जीर्णोद्धार होणे गरजेचे आहे. ^खंडाळा येथील बारवेला तीस वर्षांपूर्वी मुबलक पाणी साठा असल्याने महीला व ग्रामस्थ हाताने पाणी घेत होते व जनावरांना पिण्याच्या पाण्याचे स्वतंत्र व्यवस्था केलेली होती .आज त्याची दैनिअवस्था झाली आहे. -संजय सुर्यवंशी, ग्रामस्थ खंडाळा ^खंडाळ्यातील बारवे लगत गुरुवार रोजी आठवडी बाजार भरत असतो बाजार संपल्यानंतर या बारवेत कचरा टाकल्या जातो. त्यामुळे अधिक प्रमाणात परीसरात दुर्गंधी पसरत आहे. -रमेश बागुल, माजी सरपंच तीस वर्षांपूर्वी होते बारवेत पाणी
Source link
खंडाळ्यातील बारवेला पडले तडे, सर्वत्र कचरा:पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील वास्तू दुर्लक्षित