Headlines

गुलमोहरची "पाच' गोलने सरशी, तर "फिरोदिया'ची टायब्रेकरमध्ये बाजी!:दोन्ही संघ उपांत्य फेरीत; आज अंतिम फेरीसाठी महासंग्राम




शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला मैदानावर सुरू असलेल्या ‘ॲलेक्स कप’ फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी गुलमोहर स्पोर्टस क्लब आणि फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी यांनी विजयाची मोहोर उमटवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. वेगवान पासिंग आणि अचूक फिनिशिंगच्या जोरावर हे सामने प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले. दिवसातील पहिला सामना गुलमोहर फुटबॉल क्लब आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच गुलमोहरच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व निर्माण केले. जलद हालचाली, अचूक पासिंग आणि समन्वयपूर्ण खेळाच्या जोरावर गुलमोहरने तब्बल ५-० गोलने शानदार विजय संपादन केला. सामन्याच्या १६ व्या मिनिटाला प्रणव पंडित याने पहिला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर आदित्य गुगळे याने २२ व्या आणि ३८ व्या मिनिटाला सलग दोन गोल करत संघाला मजबूत आघाडी मिळवून दिली. ३३ व्या मिनिटाला पार्थ मस्कर याने आणखी एक गोल करत प्रतिस्पर्ध्यांवरील दबाव वाढवला. सामन्याच्या ४७ व्या मिनिटाला अहमदनगर डिस्ट्रिक्ट संघाकडून झालेल्या ‘ऑन गोल’मुळे गुलमोहरच्या खात्यात पाचवा गोल जमा झाला. संपूर्ण सामन्यात अहमदनगर डिस्ट्रिक्ट संघाला एकही गोल करता आला नाही. दिवसातील दुसरा सामना सुमन फुटबॉल क्लब आणि फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी यांच्यात रंगला. दोन्ही संघांनी सुरुवातीपासून सावध आणि बचावात्मक खेळ करत एकमेकांना जोरदार टक्कर दिली. आक्रमण आणि प्रतिआक्रमणांच्या मालिकेनंतरही नियोजित वेळेत कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. त्यामुळे सामना ०-० गोलने अनिर्णित राहिला. यानंतर सामन्याचा निकाल पेनल्टी टायब्रेकरवर लागला. अत्यंत तणावपूर्ण वातावरणात फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीने ४-३ गोलने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश निश्‍चित केला. सुमन फुटबॉल क्लबकडून अविनाश शिंदे, अक्षय गायकवाड आणि तनिष्क गायकवाड यांनी प्रत्येकी एक गोल केला. तर फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीकडून ट्‌स्क डमपुई, जोसी ललसाईमसंग, जोसेफ पुया आणि क्लिमेंट चँगसन यांनी अचूक गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या संघात रंगणार उपांत्य फेरीचे सामने { भुईकोट किल्ला मैदानावर शुक्रवारी संध्याकाळी उपांत्य फेरीचे सामने रंगणार असून फुटबॉलप्रेमींसाठी मोठा थरार पाहायला मिळणार आहे. { फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लब विरुध्द गुलमोहर स्पोर्टस क्लब { फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी विरुध्द फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड { उपांत्य फेरीत कोणते संघ अंतिम फेरीत प्रवेश करतात याकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *