Headlines

गोंदियात निवृत्त प्राध्यापकाची दगड-विटांनी ठेचून हत्या:फार्महाऊस परिसरात मृतदेह आढळल्याने खळबळ




गोंदिया जिल्ह्यातील आमगाव परिसरात निवृत्त प्राध्यापकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. भवभूती महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले चंद्रशेखर भास्कर दहिकर (वय ६२, रा. बोथली) यांचा अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर वीट मारून खून केला. मंगळवारी रात्री १० ते १०.३० वाजेदरम्यान ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह फार्महाऊस परिसरात आढळून आल्यानंतर गावात खळबळ उडाली. या प्रकरणी आमगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. जेवणाच्या कार्यक्रमाला गेले होते प्राध्यापक मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर दहिकर हे भवभूती महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ते बोथली येथील आपल्या शेतात राहत होते. मंगळवारी ते गावात आयोजित एका कार्यक्रमाला जेवणासाठी गेले होते. कार्यक्रमात जेवण केल्यानंतर ते परतले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी दहिकर यांच्या डोक्यावर वीट मारून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह फार्महाऊस परिसरात टाकण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. तसेच हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, हेही अद्याप समजू शकलेले नाही. सकाळी मृतदेह आढळल्याने गावात खळबळ बुधवारी सकाळी फार्महाऊस परिसरात दहिकर यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती गावातील सरपंच आणि पोलीस पाटील यांना दिली. पोलीस पाटलांनी तत्काळ आमगाव पोलिसांना घटनेची माहिती कळवली. माहिती मिळताच आमगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. प्राध्यापकासारख्या सुशिक्षित व्यक्तीची अशा प्रकारे हत्या झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. घटनेमुळे बोथली गावासह परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल घटनेची गंभीरता लक्षात घेऊन आमगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणात अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेशी संबंधित माहिती गोळा केली जात असून, हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. दहिकर यांच्यावर हल्ला कोणी केला, हत्येपूर्वी त्यांच्यासोबत काही वाद झाला होता का आणि आरोपींनी मृतदेह फार्महाऊस परिसरात का टाकला, या प्रश्नांची उत्तरे तपासातून स्पष्ट होणार आहेत. पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत. मात्र, हत्येचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हेही वाचा… हक्काची जागा सोडली, वरिष्ठांना विश्वासात न घेता निर्णय:लोकांचा विश्वास मिळवायचा असेल तर कठोर आत्मपरीक्षण करा; विधान परिषद निकालांवरून प्रफुल पटेलांचा घरचा आहेर महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोटात प्रचंड मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी समाजमाध्यमांवर थेट पोस्ट करत आपल्याच पक्ष नेतृत्वाला उघडपणे घरचा आहेर दिला आहे. “आजचे विधान परिषदेचे निकाल हा पक्षासाठी एक अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वाचा इशारा आहेत. जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करायचा असेल आणि संघटनेत सुधारणा घडवून आणायची असेल, तर तातडीने कठोर आत्मपरीक्षण करावेच लागेल,” अशा स्पष्ट शब्दांत प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला आहे. विधान परिषद निवडणुकीतील अपेक्षेपेक्षा निराशाजनक कामगिरी आणि पक्षांतर्गत वाढती अस्वस्थता या पार्श्वभूमीवर प्रफुल पटेल यांच्या या भूमिकेने महायुतीसह राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *