![]()
कोल्हापुरातील प्रतिष्ठेची लढाई मानली जाणारी म्हणजे गोकुळ दूध उत्पादक संघाची निवडणूक. या निवडणुकीची राज्यभर चर्चा सुरू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेस नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. या निवडणुकीचे मतदान पार पडले असून सध्या मतमोजणी सुरू आहे. याच मतमोजणीत आतापर्यंत सतेज पाटील यांचे पॅनल तब्बल 15 उमेदवार आघाडीवर आहेत. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या 25 जागांसाठी 50 उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 5 हजार 418 पात्र मतदारांपैकी 5 हजार 416 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जवळपास 99.96 टक्के मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे. कारण या ठिकाणी एकूण 25 जागांपैकी 14 जागांवर सतेज पाटील यांच्या नेतृत्वातइल राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अन्य 11 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. या निवडणुकीसाठी सतेज पाटील यांनी गेल्या दोन महिन्यांपासून प्रचार सुरू केला होता. तर दुसरीकडे महायुती म्हणजेच हसन मुश्रीफ यांच्याकडूनही जोरदार तयारी करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर मुश्रीफ यांनी यल्लमा देवीच्या परडी, भंडारावर हात मारून त्यांना ‘आम्हालाच मतदान करा, आम्हाला मतदान केले नाही तर देवीचा कोप होईल आणि बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेनस्ट्रोक होईल’, इथपर्यंत धमक्या देण्यात आल्या होत्या.
Source link
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांच्या पॅनलची आघाडी:हसन मुश्रीफ यांच्या महायुतीला धक्का, आघाडी सत्ता स्थापनेच्या दिशेने