Headlines

गोकुळमध्ये महायुतीचा रडीचा डाव:तुम्ही गुजरातसाठी लाचारी पत्करल्याने तुमच्यात उत्तरे देण्याची हिंमत नाही, राजू शेट्टींचा फडणवीसांवर घणाघात




कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती सरकारने ४ शासन नियुक्त संचालक नेमून या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप विरोधकांकडून होत असतानाच, आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या वादात उडी घेतली आहे. “गोकुळ दूध संघाच्या चेअरमन निवडीमध्ये महायुती सरकारने रडीचा डाव खेळून बेकायदेशीर पद्धतीने चेअरमन निवड करण्याचा घाट घातला आहे,” असा आरोप करत राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ८ कायदेशीर प्रश्नांचे खुले आव्हान दिले आहे. ‘स्वतःला विद्वान समजणाऱ्या फडणवीसांनी उत्तरे द्यावीत’ सोशल मीडियावर एक अत्यंत आक्रमक पोस्ट शेअर करत राजू शेट्टी यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “संचालक मंडळ सभेचा कोरम पूर्ण करण्यासाठी शासन नियुक्त संचालक नियुक्त केले व त्यानंतर चेअरमन निवडीचा मार्ग कायदेशीर होणार आहे, अशी सारवासारव महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस करत आहेत. पण कायद्याचे गाढे अभ्यासक व स्वतःला विद्वान समजणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” असे आव्हान शेट्टी यांनी दिले आहे. राजू शेट्टींनी उपस्थित केलेले ८ रोखठोक प्रश्न आणि मुद्दे ‘तुम्ही गुजरातसाठी लाचारी पत्करली आहे’ राजू शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. “देवाभाऊ, मला वाटत नाही तुमच्यामध्ये या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत असेल; कारण तुम्ही गुजरातसाठी लाचारी पत्करली आहे,” असा घणाघात शेट्टी यांनी केला आहे. ———- हेही वाचा.. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान:समविचारी आघाडी की महायुती? गोकुळ चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप; 700 पोलिसांचा बंदोबस्त

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील आणि रणजीतसिंह पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. यामध्यो कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी, राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अतिरिक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या अध्यादेशावरून निर्माण झालेल्या कायदेशीर पेचावर औरंगाबाद खंडपीठाने अत्यंत महत्त्वाचा अंतरिम निर्णय दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *