Headlines

चाकूचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्या 3 जणांना अटक:मुद्देमाल जप्त, फुलंब्री पोलिसांची कारवाई




चाकूचा धाक दाखवून एकाला मारहाण करत मोबाईल व रोख रक्कम लुटणाऱ्या तीन आरोपींना फुलंब्री पोलिसांनी अवघ्या काही तासांतच अटक केली. १८ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता फुलंब्री ठाण्याच्या हद्दीतील सावंगी बायपास रोडवरील पुलाजवळ ही घटना घडली होती. याप्रकरणी फुलंब्री ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.१० वाजता खुशालसिंग नानकसिंग गिल (२३, रा. कोलठाणवाडी), सागर ऊर्फ मारी इंदरसिंग जारवाल (२२, रा. कृष्णापूरवाडी) आणि घनश्याम सुपडसिंग घुशिंगे (२६, रा. कृष्णापूरवाडी) या तिघांना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली स्कूटी, रिक्षा, चाकू, दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली, फुलंब्री ठाण्याच्या प्रभारी डॉ. सोनाली पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, दवंगे, राठोड, नागरगोजे, अंमलदार गायकवाड यांच्या पथकाने केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *