Headlines

चापानेरच्या जिल्हा परिषद शाळेस संतप्त ग्रामस्थांनी लावले कुलूप:शिक्षक नियुक्तीची मागणी, प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल नाही‎




जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभाग यांच्याकडे वारंवार निवेदने देऊनही शिक्षक न मिळाल्याने संतप्त पालक व ग्रामस्थांनी अखेर चापानेर येथील जिल्हा परिषद प्रशालेला बुधवारी कुलूप तीव्र निषेध व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमिकच्या ८ वी ते १० वीच्या वर्गांना गणित, इंग्रजी आणि विज्ञान या महत्त्वाच्या विषयांसाठी शिक्षकच उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्राथमिक शिक्षक या विषयांचे अध्यापन करत आहेत. शासनाचे कॉपीमुक्त अभियान स्वागतार्ह असले, तरी वर्गात विषयाचे अध्यापनच झाले नाही तर विद्यार्थ्यांनी परीक्षेत काय लिहावे, असा सवाल पालकांनी केला आहे. दिवसभर आंदोलन चालूनही एकही अधिकारी फिरकला नाही. या आंदोलनात सरपंच बाबुराव सातदिवे, उपसरपंच कल्याण पवार, शालेय समिती अध्यक्ष गणेश पवार, ज्ञानेश्वर घुले, जगन पवार, संतोष पवार, जनार्दन सातादिवे, भाऊसाहेब आघाडे, सीमा हसणे यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *