![]()
चालक कर्मचारी यांना नियमित वेतनश्रेणीवर रुजू करून घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना सादर केलेल्या निवेदनातून केली. तसेच याप्रसंगी कामगार सेनेतर्फे ना. सरनाईक यांचा सत्कारही करण्यात आला. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने नियमित वेतनावर कर्मचाऱ्यांना रूजू करून घेण्याच्या मागणीसाठी काही कर्मचाऱ्यांचे उदाहरणंही दिली. अकोला आगार क्रमांक १ येथील कामगार सेनेचे पदाधिकारी व सभासद गोविंद पातालबन्सी , शेख जाबीर शेख नजीर, संदीप पळसपगार, . दीपक सुरवाडे, दीपक इंगळे. अकोला आगार क्रमांक २ येथील विठ्ठल भिवटे , खाडे चालक पदी १४ जुलै २०१६ पासून रुजू झाले असून, ते आजपर्यंत कार्यरत आहेत. २०२६ मध्ये जवळपास १० वर्ष सेवा कालावधी होऊनसुद्धा नियमित वेतनश्रेणीवर घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे १ वर्षाला ५२ आठवड्याचे हजेरी दिवस सेवा कालावधी न धरल्यामुळे कर्मचारी यांचे वार्षिक वेतन वाढमध्ये व दरवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पूर्ण महिन्याचे काम करून पूर्ण महिन्याचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे चालक कर्मचारी यांचे आर्थिक नुकसान होत आहे. निवेदन सेनेचे अध्यक्ष चंद्रशेखर चऱ्हाटे, विभागीय सचिव उदय गंगाखेडकर ,कार्याध्यक्ष प्रवीण ताम्हणे ,करूणा सिरसाट, भागवत गिरी ,राजेश राऊत ,असिफ खतीब, गोविंद पाताळपंची, मनीष लाहूळकर, मणीष नागे आदी उपस्थित होते.
Source link
चालक कर्मचारी यांना नियमित वेतनश्रेणीवर रुजू करण्याची मागणी:महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून परिवहन मंत्र्यांना लेखी निवेदन