Headlines

चालत्या दुचाकीवरून चोरांनी महिलेचे गंठण हिसकावून नेले:पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल




गजबजलेल्या भागात दोन दुचाकीस्वारांनी चालत्या गाडीवरून शिक्षिकेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी प्रियांका मुकेश चुडीवाल (४०, रा. अयोध्यानगर) त्यांच्या नणंदेला भेटण्यासाठी त्यांच्या स्कूटीवरून निघाल्या होत्या. रिलायन्स मॉलसमोरून जात असताना, मागून एका जुन्या दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण आले. त्यांनी प्रियांका यांच्या स्कूटीजवळ गाडी आणली आणि काही कळण्याच्या आतच दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने प्रियांका यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे जुने वापरते सोन्याचे मिनी गंठण हिसकावून घेतले. महिलेची पोत तोडली राखी पौर्णिमेच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या एका विवाहितेचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना गेल्या २७ ऑगस्ट रोजी विठ्ठल चौक परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गारखेडा चेन स्नॅचिंगचा अड्डा गारखेडा परिसरापासून ते बीड बायपासपर्यंतचा भाग हा चेन स्नॅचिंग करणाऱ्याचा अड्डा बनला आहे. या भागात बाजारपेठ, मोठे रुग्णालय, मॉल असून वस्ती देखील मोठ्या प्रमाणात आहे. तसेच अरुंद रस्ते असून थेट शहराच्या बाहेर जाण्याची संधी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *