![]()
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देत नाचनवेल विभागातील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी नाचनवेल चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले होते.चिमुकल्यांच्या हस्ते प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मंडळ अधिकारी विकास वाघ, पिशोर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, तलाठी सतीश बनकर तसेच तलाठी संगीता सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
Source link
रास्ता रोको:नाचनवेल येथे मराठा समाजाचा रास्ता रोको