Headlines

छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपकडे!:महायुतीचा विधान परिषदेचा फॉर्म्युला ठरला; भाजप 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार




स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून, एकूण 17 जागांचा अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. राज्य आणि केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर, तसेच मित्रपक्षांमधील रस्सीखेच व दावे-प्रतिदाव्यांनंतर या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाला आहे. या अंतिम फॉर्म्युलानुसार सर्वाधिक 11 जागांवर भाजप निवडणूक लढवणार आहे, तर शिवसेना शिंदे गटाला 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा सोडण्यात आल्या आहेत. या राजकीय वाटाघाटींमध्ये अतिरिक्त एक जागा पदारात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यश आले असले तरी, तब्बल 7 जागांसाठी आग्रही असणाऱ्या शिवसेनेला मात्र अखेर 4 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा देखील भाजपकडे गेली आहे. भाजपकडे कोणत्या जागा? 1. सोलापूर
2. जळगाव
3. भंडारा-गोंदिया
4. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
5. अमरावती
6. धाराशिव-लातूर-बीड
7. नागपूर
8. छ.संभाजीनगर- जालना
9. अहिल्यानगर
10. सांगली-सातारा
11. नांदेड राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे कोणत्या जागा? 1. कोकण
2. पुणे शिवसेना शिंदे गटाकडे कोणत्या जागा? 1. ठाणे
2. नाशिक
3. परभणी
4. यवतमाळ राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे, विधान परिषदेच्या या मतदारसंघांतील विद्यमान आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही पुढील निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. परिणामी, गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या जागा रिक्त आहेत. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्यांपैकी 22 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून दिले जातात. नियमानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येच्या 75 टक्के मतदार उपलब्ध असतील, तरच ही विधान परिषदेची निवडणूक घेता येते. याच निकषांच्या आधारे आता प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार राज्यातील सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक आणि अमरावती या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधील विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक पार पडणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *