Headlines

जंतर-मंतर आंदोलनापूर्वी पोलिसांची नोटीस:अभिजीत दिपके म्हणाले- महाराष्ट्र पोलिसांनी आपली प्रतिमा जपावी




दिल्लीतील जंतरमंतरवर होणाऱ्या आंदोलनासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून बजावण्यात आलेल्या नोटिसा आणि मुंबईत आदिवासी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईवरून अभिजीत दिपके यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पोलिसांवर हुकूमशाही आणि दडपशाहीचा आरोप करत, ‘स्कॉटलंड यार्ड’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी दिल्ली पोलिसांसारखी गुंडगिरी करू नये, असे सुनावले आहेत. ‘आंदोलन हिंसक होणार हे आधीच कसं माहिती?’ चंद्रपूर पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना (वॉलेंटियर्सना) जंतरमंतर येथील आंदोलनात सहभागी न होण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यावर आक्षेप घेत दिपके म्हणाले, “या नोटिशीमध्ये पोलिसांनी आंदोलन हिंसक होण्याची शक्यता वर्तवली आहे. पण चंद्रपूर पोलिसांना हे आधीच कसे माहिती? त्यांनी स्वतःच असा काही प्लॅन करून ठेवला आहे का?” असा संतापजनक सवाल त्यांनी विचारला. कार्यकर्त्यांच्या दिल्ली प्रवासाचा खर्च कुठून येतोय, याची चौकशी करण्याचा अधिकार चंद्रपूर पोलिसांना कुणी दिला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्ही सातत्याने गांधी आणि आंबेडकरांचे विचार मांडत आहोत, हे पोलिसांना हिंसक वाटते का? असे आव्हानही त्यांनी दिले. ‘अंबानीचा मुलगा असता तर मारलं असतं का?’ राहुल पावरा यांच्या नेतृत्वाखालील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचाही दिपके यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले, “क्रिमिनल्स कमी झालेत का, जे तुम्ही हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना हात लावताय? हाच जर अंबानीचा मुलगा असता किंवा आमदारांची-खासदारांची मुले असा मोर्चा घेऊन गेली असती, तर पोलिसांनी त्यांच्यावर अशी कारवाई केली असती का? त्यांना असेच मारले असते का?” असा थेट सवाल त्यांनी सरकार आणि प्रशासनाला विचारला आहे. ‘दिल्ली पोलिसांसारखी हुकूमशाही करू नका’ दिपके म्हणाले, एकीकडे एक मराठी मुलगा दिल्लीत जाऊन दिल्ली पोलिसांच्या डोळ्यांत डोळे घालून सांगतो की ‘तुम्ही महाराष्ट्र पोलिसांकडून शिका’, आणि दुसरीकडे महाराष्ट्र पोलीसच अशी दडपशाही करत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची तुलना थेट ‘स्कॉटलंड यार्ड’शी केली जाते. त्यांनी आपली ही प्रतिमा जपावी आणि दिल्ली पोलिसांसारखी गुंडगिरी व हुकूमशाही करू नये,” स्पष्ट मत अभिजीत दिपके यांनी व्यक्त केले. ———— ही बातमी पण वाचा.. पोलिसांनी विरोधकांचा मार्च रोखला, राहुल-प्रियंका ताब्यात:काँग्रेस खासदारांनी बसचा मार्ग रोखला; ECI विरोधात 5 दिवसांत 5 वे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी १९ विरोधी पक्षांचे खासदार ‘लोकशाही वाचवा’ (Save Democracy) मोर्चा काढत आहेत. ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या बाहेर पोलिसांनी या विरोधी पक्षांच्या खासदारांना पुढे जाण्यापासून रोखले. हातात तिरंगा घेऊन राहुल गांधी बॅरिकेड्सवर चढले. पोलिसांनी राहुल आणि प्रियांका यांना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *