Headlines

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जवाहर नवोदय विद्यालयास भेट:वसतिगृह, भोजनालयाची पाहणी; विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक गुणवत्तेची घेतली माहिती




वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी ता. 29 भेट देऊन विद्यालयातील विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या निवास, आहार व शिक्षणाच्या दर्जाबाबत सविस्तर माहिती घेत समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी विद्यालयातील वसतिगृहाची पाहणी करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या निवास सुविधांची माहिती जाणून घेतली. स्वच्छता, सुरक्षितता तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर त्यांनी विद्यालयातील भोजनालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराबाबत माहिती घेतली. भोजनाची गुणवत्ता, पौष्टिकता, स्वच्छता आणि वेळापत्रकानुसार भोजन पुरवठा याबाबत संबंधितांकडून माहिती जाणून घेतली. स्वयंपाकगृहाची पाहणी करताना अन्नधान्य साठवण, स्वच्छता व्यवस्था तसेच स्वयंपाक प्रक्रियेबाबतही त्यांनी माहिती घेतली. जिल्हाधिकारी गुप्ता यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगती, दैनंदिन अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा तयारी तसेच विद्यालयातील सुविधांबाबत अभिप्राय जाणून घेतला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत विद्यालयातील उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण संवादामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निकाल, विविध स्पर्धांमधील सहभाग तसेच ॲकॅडमिक परफॉर्मन्सचा आढावा घेत जिल्हाधिकारी गुप्ता यांनी विद्यालयाच्या एकूण कामकाजाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मारोती घोणसेटवाड, वरिष्ठ शिक्षक किशन गायकवाड यांच्यासह शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *