Headlines

जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेतील गैरकारभाराचा अहवाल सादर करा:डीडीआर सुरेखा फुपाटे यांचे आदेश, एक सदस्यीय समिती स्थापन




हिंगोली जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेतील गैरकारभाराची चौकशी करून सहा महिन्यात अहवाल सादर करण्याच आदेश जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी दिले आहेत. त्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या विरोधात तक्रारींचा ओघ वाढला होता. या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक फुफाटे यांनी सुनावणी घेतली होती. या सुनावणी नंतर पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक अक्षय गुठ्ठे यांची नियुक्ती केली आहे. तर पतसंस्थेने संचालक मंडळ बरखास्तीवर आक्षेप घेऊन विभागीय निबंधकांकडे अपील केले होते. मात्र त्या ठिकाणीही अपील फेटाळून लावण्यात आले. दरम्यान, त्यानंतर पतसंस्थेचे सचिव गंगाराम ढेंगळे तसेच चार कर्मचाऱ्यांसह इतरांनी पतसंस्थेच्या कारभाराबाबत तक्रारी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत असून शेअर्स व ठेव परत दिली जात नाही, नियमबाह्य कर्ज वाटप केले तसेच रोख रक्कम उचल केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. यामध्ये चौकशी अधिकारी म्हणून रामेश्‍वर खोंड यांची नियुक्ती केली आहे. संस्थेचे उपविधीतील तरतुदीनुसार चौकशी करून सहा महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश उपनिबंधक फुपाटे यांनी दिले आहे. त्यामुळे आता पतसंस्थेच्या कारभाराची सखोल चौकशी होणार असून या चौकशी मध्ये काय निष्पन्न होणार याकडे संस्थेच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *