![]()
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) निवडणुकीची घोषणा येत्या दोन दिवसांत होणार आहे. जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) राजेश भुयार यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून, सहकार प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. नियमानुसार, अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यावर १० ते २० दिवसांत निवडणुकीची घोषणा गरजेची आहे. बँकेची अंतिम मतदार यादी १४ ऑक्टोबरला जाहीर झाली. येत्या दोन दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज आहे. बँकेच्या २० सदस्यीय संचालक मंडळाचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर रोजी संपला. वाद व न्यायालयीन प्रकरणांमुळे निवडणूक वेळेत झाली नाही. सध्या बँकेचे दैनंदिन कामकाज प्रशासक पाहत आहेत. निवडणूक प्रक्रिया सप्टेंबरमध्ये सुरू झाली. २१ सप्टेंबरला मतदारांची कच्ची यादी जाहीर झाली. हरकतींवर सुनावणी झाली व १४ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध झाली, ज्यात २ हजार ८५२ मतदार मतदान करू शकतात.
Source link
जिल्हा बँकेच्या निवडणुकीची दोन दिवसांत घोषणा:डीडीआर राजेश भुयार निवडणूक अधिकारी, सहकार प्राधिकरणाची मान्यता