![]()
अमरावती: हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सार्वजनिक आरोग्य आयुक्त संजय काटकर यांची भेट घेतली. डी.एस. पवार यांच्या नेतृत्वात दोन्ही संघटनांनी आयुक्तांना निवेदन दिले. या निवेदनात आरोग्य पर्यवेक्षक पदावरील पदोन्नतीची प्रकरणे गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याचे म्हटले आहे. १६ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार नियुक्ती प्राधिकारी बदलल्याने ही प्रकरणे थांबली आहेत. यापूर्वी आरोग्यमंत्र्यांनी १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, पण अद्याप कार्यवाही झाली नाही. आयुक्तांनी काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. विनंती बदल्यांमधील अन्याय दूर करावा, आरोग्य निरीक्षक व क्षेत्र कर्मचाऱ्यांची पदोन्नती करावी, बायोमेट्रिक हजेरीतून क्षेत्र कर्मचाऱ्यांना सूट द्यावी, तसेच सेवांतर्गत प्रगतीचा लाभ द्यावा, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. आयुक्तांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले. डी.एस. पवार यांनी सांगितले की, मागण्यांवर लवकर निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल. यावेळी बाळासाहेब तराळ, प्रकाश दातीर, सचिन गायकवाड, बबन खंडारे आदी उपस्थित होते.
Source link
हिवताप कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीसाठी आरोग्य आयुक्तांना निवेदन दिले:दोन वर्षांपासून रखडलेली प्रकरणे मार्गी लावण्याची मागणी, आंदोलनाचा इशारा