Headlines

जि. प. शाळांत मोफत पुस्तकांचे वितरण:मनपात 70% मुलांनाच मिळाले गणवेश‎, रांगोळी काढत व ढोल ताशांच्या गजरात स्वागत; मिष्टान्नाचे वाटप‎



विद्यार्थ्यांमध्ये शाळा-शिक्षणविषयक आवड निर्माण व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने ३० जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा केला. महापालिकेच्या काही शाळांमध्ये ७० टक्के मुलांनाच गणवेश मिळाल्याचे समोर आले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पाठ्यपुस्तके मिळाल्या

.

जिल्ह्यात मंगळवारी शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी यांनी त्यांच्या मतदारसंघातील किमान एका शाळेत भेट देऊन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी निर्देश देण्यात आले होते. या अनुषंगाने ३० जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला. शाळेची पहिली घंटा वाजली. मात्र शहरातील काही शाळांमध्ये ३० टक्के गणवेशाचे वाटप होऊ शकले उर्वरित पान ४ जय हिंद चौकातील जि.प. शाळेत दोन खोल्यांची मिळून एक मोठी खोली आहे. यात पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी- विद्यार्थिनी बसतात. त्यामुळे शिक्षक शिकवतांना कोणत्या विद्यार्थ्याला काय ऐकू येत असेल, या संशोधनाचा विषय आहे. जागेचा अभाव असून, लवकरच दोन वर्ग समोरच असलेल्या जि.प.च्या दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले. शाळेत इयत्ता पहिलीच्या-१५, दुसरीच्या १८, तिसरी-१३ तर इयत्ता चौथीची पटसंख्या १२ आहे. एकूण विद्यार्थी-विद्यार्थ िनींच्या संख्या ५८ आहे.

एकाच खोलीत भरतात चार वर्ग



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *